Home » महाराष्ट्र माझा » नांदेडमध्ये पत्रकारांचे निषेध आंदोलन.

नांदेडमध्ये पत्रकारांचे निषेध आंदोलन.

नांदेडमध्ये पत्रकारांचे निषेध आंदोलन.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर याचं निष्काळजीपणा मुळं निधन झाले.. रायकर वर योग्य वेळेत योग्य उपचार झाले नाहीत परिणामतः एक तरूण उमदा पत्रकार मृत्युमुखी पडला.. याची संतप्त प़तिक़िया राज्यभर उमटली.. मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाने तर आज काळ्या फिती लावून निषेध आंदोलन केलं.. पत्रकारांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं.. रायकर च्या बाबतीत निष्काळजीपणा दाखविणारयावर कडक कारवाई व्हावी, त्याच्या कुटुंबियांना मदत मिळावी आणि कोणत्याही पत्रकारावर अशी वेळ येऊ नये म्हणून प्रत्येक रूग्णालयात पत्रकारांसाठी राखीव बेडची व्यवस्था करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.. यावेळी नांदेडमधील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते..

Leave a Reply

Your email address will not be published.