Home » महाराष्ट्र माझा » संपाबाबतचा अंतिम निर्णय ऊसतोड कामगाराच्या नेत्या पंकजाताई मुंडे घेणार – मा.आ.केशवराव आंधळे

संपाबाबतचा अंतिम निर्णय ऊसतोड कामगाराच्या नेत्या पंकजाताई मुंडे घेणार – मा.आ.केशवराव आंधळे

संपाबाबतचा अंतिम निर्णय ऊसतोड कामगाराच्या नेत्या पंकजाताई मुंडे घेणार – मा.आ.केशवराव आंधळे

– डोंगरचा राजा / आँनलाईन..

यावर्षीचा खरीप हंगाम चांगला साधला आहे. राज्यात सर्वदूर मुबलक प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे ऊसतोडणीसाठी जाणाऱ्या मजुरांची संख्या घटण्याची शक्यता आहे. करोनामुळे मजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या परिस्थितीत ऊसतोड मजूर संघटना संप करण्याच्या विचारात आहे.आगामी ऊसगाळप हंगामावर आतापासूनच संकटाचे ढग जमू लागले आहेत. यामुळे ऊस उत्पादक व साखर कारखानदारासाठी यंदाचा गाळप हंगाम कसोटीचा ठरणार आहे. आगामी गळीत हंगामापासून ऊसतोडणी कामगार,मुकादम व वाहतुकदारांच्या दरवाढीसाठी संपा संदर्भात अंतिम निर्णय माजी मंत्री पंकजाताई मुंडे घेणार असल्याचे मत माजी आमदार केशवराव आंधळे यांनी व्यक्त केले आहे

याबाबत अधिक माहिती अशी की,
ऊसतोड कामगारांचा संप व 150% मजुरीत दर वाढ व कामगार कायदे लागु करावेत व वाहतुकीत 100% दर वाढ करावी यासाठी
माजी मंत्री पंकजाताई मुंडे व खा.डाॅ प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोपीनाथरावजी मुंडे साहेब ऊस तोड कामगार, मुकदम, व वाहतुकदार संघटना व ऊसतोड कामगार व मुकदम संघटना महाराष्ट्र राज्य यांची आज केज मतदार संघात बैठक घेण्यात आली बैठकीचे मार्गदर्शक मा. केशवराव आंधळे, मा. अक्षय भैय्या मुंदडा, गोरक्ष दादा रसाळ दत्तुबा भागे,देविदास तोडे, तुकाराम तिडके,संर्जराव वाघमोडे, आदी प्रमुख उपस्थित होते. पुढे बोलताना माजी आमदार आंधळे म्हणाले की, राज्यात ऊसतोडणी कामगार क्षेत्रात 12 संघटना व सुमारे पंधरा लाख ऊसतोडणी मजूर कार्यरत आहेत. सर्वात मोठी व प्रभावशाली संघटना म्हणून पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखालील लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार व मुकादम व वाहतूकदार संघटना म्हणून ओळखली जाते. पंकजाताई मुंडे यांनी ऊसतोडणी मजुरांना केंद्रस्थानी मानून नेहमीच न्याय दिला आहे. ऊसतोडणी मजूर मोठ्या संख्येने पंकजाताईंबरोबर असल्याने साखर संघ व कारखानदारांचे त्यांच्या भुमिकेकडे लक्ष आहे. साखर संघ व संघटनेदरम्यान दरवाढीच्या कराराची मुदत यावर्षी संपल्याने तोडणीसाठी प्रतिटन पाचशे रुपये व मुकादमाच्या कमिशनमध्ये दरवाढ या प्रमुख मुद्यांवर संप पुकारला जाणार आहे. 2015 मध्ये संप करून पंकजाताई मुंडे यांनी 20 टक्के वाढ मिळवून दिली होती. संप करण्याच्या पूर्वी त्या ऊसतोडणी मजूर, मुकादम यांच्याशी चर्चा करून विश्वासात घेऊनच संपाची घोषणा करतात. त्यामुळेच ऊसतोडणी मजूर असणार्‍या तालुक्यात बैठका घेऊन अडचणी व दरवाढीबाबत चर्चा करून पंकजाताईंसमोर भूमिका मांडणार आहोत. संपाबाबतचा अंतिम निर्णय ऊसतोड कामगाराच्या नेत्या पंकजाताई मुंडे घेणार असल्याचे मत माजी आमदार केशवराव आंधळे यांनी व्यक्त केले आहे. यावेळी संर्जराव डोईफोडे, जयदेव तिडके, सचिन मैद, महादेव बडे, अर्जुन तिडके, दादाराव घोळवे, पप्पु चाटे, मुरली ढाकणे, विक्रम काळे,भगवान केदार, सुनिल गलाडे, हनुमान नागरगोजे,ऊधव दराडे, बंडू राठोड, जंगनाथ जाधव, डाॅ श्रीधर चोरे, डाॅ संभाजी वायबसे, बाळासाहेब तिडके, माणिक लांब, माणिक तिडके, महादेव वरपे, कृष्णा तिडके, बीड जिल्हा संपर्कप्रमुख व सर्व पदाआधिकरी व कामगार व मुकदम आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.