किशोर लोखंडे यास शासनाने पुरस्कार द्यावा – गोकुळ इंगोले.
– डोंगरचा राजा / आँनलाईन.
– 26 तास अविरतपणे पोकलेन चालवणाऱ्या रियल हिरो किशोर भागवत लोखंडे यास महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन गौरव करावा.
बीड – महाडमध्ये इमारत कोसळून झालेल्या पाच मजली इमारत 24 ऑगस्टला संध्याकाळच्या सुमारास कोसळली. या दुर्घटनेला 40 तास उलटल्यानंतर हे शोध कार्य संपलं. या दुर्घटनेतील बचावकार्याला गती देण्यासाठी माणुसकीला महत्त्व देत अविरतपणे एका रिअल हिरोने तब्बल 26 तास पोकलेन चालवलं आहे. किशोर भागवत लोखंडे (24) असे या व्यक्तीचे नाव आहे. किशोर लोखंडे हा बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील उखंडा लिंबादेवी या ठिकाणी राहतो. यासाठी किशोरने तब्बल 26 तास अविरतपणे पोकलेन चालवलं. या खऱ्या नायकाने प्रशंसनीय असे काम केले. त्यामुळे महाड दुर्घटनेनतंर शोधकार्यात तो खरा रिअल हिरो ठरला. त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.महाड दुर्घटनेत स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवणार्या किशोर लोखंडे यांना महाराष्ट्र शासनाने राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देण्यासाठी शिफारस करून सन्मान करावा..
गोकुळ इंगोले.
बळीराजा प्रतिष्ठान बीड