Home » ब्रेकिंग न्यूज » बंजारा समाज पोरका झाला – बी.एम.पवार

बंजारा समाज पोरका झाला – बी.एम.पवार

बंजारा समाज पोरका झाला – बी.एम.पवार

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

– अखिल भारतीय ब़ंजारा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि पुरोगामी चळवळीतील साहित्यिक प्रेमदास महाराज वनोलिकर यांच्या निधनामुळे बंजारा समाज पोरका झाला – बी.एम.पवार

वडवणी – गेल्या अनेक वर्षांपासून भारतातील बंजारा समाजाच्या मनावर अधिराज्य गाजविणारे साहित्य, आणि भजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे ह भ प प्रेमदास महाराज वनोलिकर यांच्या निधनामुळे बंजारा समाज पोरका झाला आहे.अशा भावना सेवालाल सेना संस्थापक अध्यक्ष बी एम पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.
[26/08, 6:18 PM] बी एम. पवार: या संदर्भात अधिक माहिती अशी की, यवतमाळ जिल्ह्यातील वनोली या गावात जन्म घेतलेल्या प्रेमदास महाराज यांच्या घरची परिस्थिती खूप नाजूक होती परंतु लहानपणापासून समाजसेवेची गोडी असल्याने प्रेमदास महाराज यांनी भजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे काम हाती घेतले, बंजारा समाजातील वाईट रिती बंद झाले पाहिजे आणि समाज विज्ञानाकडे वळला पाहिजे यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केला, भारतातील प्रत्येक तांड्यावर जाऊन संत सेवालाल महाराज यांचे विचार सांगितले.अखिल भारतीय ब़ंजारा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष म्हणून काम करत होते. त्यांनी जवळपास ४० हजार भजन तयार केली आणि आज त्याच भजनाच्या माध्यमातून तांड्यावर नंगाराचा आवाज घुमत आहे.बंजारा समाजात महापुरुषांच्या विचारांची पेरणी प्रेमदास महाराज यांनी केली होती, त्यांच्या निधनाने बंजारा समाज पोरका झाला आहे अशा भावना बी एम पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.