Home » माझी वडवणी » आ.सोळंके यांनी एका फोनवर अंधार दूर केला – नगरसेवक आळणे

आ.सोळंके यांनी एका फोनवर अंधार दूर केला – नगरसेवक आळणे

आ.सोळंके यांनी एका फोनवर अंधार दूर केला – नगरसेवक आळणे

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

वडवणी शहरातील प्रभाग क्रमांक ११ व १२ मध्ये अंधाराचे साम्राज्य निर्माण झालं होतं. सणासुदीच्या काळात प्रभागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश सोळुंके यांना या प्रभागाचे नगरसेवक लक्ष्मणराव आळणे यांनी फोन करून (डीपी) जनित्र बसवण्याची मागणी केली. आमदार प्रकाश सोळंके यांनी या मागणीची तातडीने दखल घेत संबंधितांना सूचना करून गेल्या काही दिवसांपासूनचा अंधार दूर केला आहे.

वडवणी शहरांमधील प्रभाग क्रमांक ११ व १२ मधील नागरिकांच्या सोयीसाठी असणारे जनित्र (डीपी)
मागील काही दिवसांपासून जळालेल्या अवस्थेत होते.
प्रभागातील जनतेला नाविलाजास्तव अंधाराचा सामना करावा लागत होता.या महत्त्वाच्या प्रश्नासाठी माजलगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रकाश सोळंके यांना या प्रभागाचे नगरसेवक लक्ष्मणराव आळणे यांनी फोन करून नविन जनित्र (डीपी) मिळण्यासाठी विनंती केली.आमदार प्रकाश सोळंके यांनी तेवढ्याच तत्परतेने अंबेजोगाई येथील इंजिनिअर कुरेशी व तेलगाव येथील इंजिनिअर पेन्सिलवार यांना फोन केला आणि लगेच दुसऱ्याच दिवशी जनित्र (डीपी) आले.यामुळे निश्चितच गणपती व लक्ष्मी आगमन अशा सनासुदीच्या दिवसात ११ आणि १२ या प्रभागातील अंधार दूर केला असल्याने आमदार प्रकाश सोळंके यांचे आभार नगरसेवक लक्ष्मण भानुदासराव आळणे यांनी व्यक्त केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.