Home » ब्रेकिंग न्यूज » वारे..पट्ट्यांनो.. अहोरात्र परिश्रमाचे फळ मिळालं.

वारे..पट्ट्यांनो.. अहोरात्र परिश्रमाचे फळ मिळालं.

वारे..पट्ट्यांनो.. अहोरात्र परिश्रमाचे फळ मिळालं.

– वडवणी पोलिस स्टेशनचे सर्व अॅन्टीजेन्ट टेस्ट निगेटिव्ह.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

वडवणी पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांच्या अॅन्टीजेन्ट टेस्ट घेण्यात आल्या. या टेस्टमध्ये सर्वच्या सर्व पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या असल्याने वडवणीकरांकडून एक वेगळाच आनंद व्यक्त केला जात आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, वडवणी पोलीस स्टेशनमध्ये १ पोलीस निरीक्षक, २ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ३७ पोलीस कर्मचारी, २० होमगार्ड असे एकूण ६० कर्मचारी असून या सर्वांच्या नुकत्याच अॅन्टीजेन्ट टेस्ट घेण्यात आल्या होत्या. यामध्ये सर्व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी, होमगार्ड यांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वडवणी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेशकुमार टाक यांच्या मार्गदर्शनाखाली मार्च महिन्यांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिस बांधव अहोरात्र परिश्रम घेतानाचे चित्र दिसून येत आहे. वडवणी शहर आणि तालुक्यात अगदी सुरुवाती पासून पोलीस प्रशासनाची भूमिका याकामी महत्त्वाची ठरली आहे. पोलीस निरीक्षक महेशकुमार टाक हे आपल्या पोलीस स्टेशन मधील पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामी सदैव तत्पर राहिले आहेत. त्यांच्या नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे निश्चितच ही चांगली कामगिरी म्हणावी लागेल.
दोन दिवसापूर्वीच पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्या अॅन्टीजेन्ट टेस्ट घेण्याचे नियोजन केलं होतं. यामध्ये सर्व पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांचे व होमगार्ड यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचे आनखीन बळ मिळालं आहे.
यावरून असं म्हणावं लागेल की, वारे.. पट्ट्यांनो.. अहोरात्र परिश्रमाचे फळ मिळालं..असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.तर दुसरीकडे वडवणी पोलीस स्टेशनच्या सर्व पोलीस अधिकारी, पोलिस कर्मचारी व होमगार्ड यांचं अॅन्टीजेन्ट टेस्ट रिपोर्ट
निगेटिव्ह आल्याने सर्व स्तरातून अभिनंदनही केलं जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.