Home » माझा बीड जिल्हा » बीड नगर पालिकेने दररोज पाणी पुरवठा सुरू करावा – नवनाथराव शिराळे.

बीड नगर पालिकेने दररोज पाणी पुरवठा सुरू करावा – नवनाथराव शिराळे.

बीड नगर पालिकेने दररोज पाणी पुरवठा सुरू करावा – नवनाथराव शिराळे.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

बीड शहराला बिंदुसरा धरणातुन पाणी पुरवठा करण्यात येतो. गेली अनेक वर्षांपासून या धरणा मध्ये पाणीसाठा मुबलक होत नव्हता, यामुळे बीड न.प. प्रशासनाने (CEO) आठ ते दहा दिवसाला पाणी पुरवठा वितरित करण्याचे निर्णय घेतला होता. यावर्षी वरूण राजाच्या कृपादृष्टीने अतिवृष्टी झाली असल्यामुळे बीड न.प ला पाणी पुरवठा करणारे बिंदुसरा धरण १००% भरले असून सदरील धरणाचे पाणी बीड शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यात यावा, जेणेकरून बीड शहरातील नागरिकांना दिलासा मिळेल. याची CEO यांनी गांभीर्याने तात्काळ दखल घेऊन दररोज पाणी पुरवठा करावा.अशी मागणी भाजपचे नेते मा.न.पा.सभापती नवनाथ शिराळे पाटील यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.