Home » ब्रेकिंग न्यूज » गुन्हा दाखल;आता फिरू नका – अँड.अजित देशमुख.

गुन्हा दाखल;आता फिरू नका – अँड.अजित देशमुख.

गुन्हा दाखल;आता फिरू नका – अँड.अजित देशमुख.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

बीड – कोरोना प्रादुर्भावाच्या या काळामध्ये प्रत्येकाने जपून राहण्याची वेळ आली आहे. स्वॅब दिल्यानंतर न फिरणे हे त्या नागरिकाचे कर्तव्य आहे. मात्र स्वॅब दिलीनंतर अनेक ठिकाणी फिरणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. आता स्वॅब दिल्यानंतर कोणीही फिरू नये. अन्यथा असेच गुन्हे दाखल होत रहातील, असे जन आंदोलनाचे विश्वस्त ॲड. अजित एम. देशमुख यांनी म्हटले आहे.

काल जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे यासंदर्भात मागणी करण्यात आली होती. त्यांनी मागणीची तात्काळ दखल घेतली आणि सर्व संबंधितांना आदेश दिले होते. त्यानंतर बीड येथील एक व्यक्ती स्वॅब त्यानंतर एका ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी आणि अनेक गावांना फिरून आला, हे प्रशासनाला दिसून आले. त्यामुळे हा गुन्हा दाखल झाला आहे.

सचिन खाडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, बीड यांनी आज तालुका आपत्ती व्यवस्थापन विभाग बीड चे प्रमुख म्हणून या संदर्भात दिलेल्या आदेशान्वये मंडळ अधिकारी परमेश्वर राख यांनी बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल केला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी मागणीची दखल घेऊन त्यात तात्काळ पावले उचलली. यामुळे आता अशा प्रकारच्या फिरणारांवर बंदी येईल. अथवा फिरणार्‍यांनवर असेच गुन्हे दाखल होऊन परिणाम भोगावे लागतील. मात्र अशी वेळ येऊ न देता स्वॅब देणाऱ्या प्रत्येकाने कोठेही न फिरता कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन देखील अँड. देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.