Home » ब्रेकिंग न्यूज » पंधरा गावात कंटेनमेंट झोन घोषित

पंधरा गावात कंटेनमेंट झोन घोषित

पंधरा गावात कंटेनमेंट झोन घोषित

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

बीड – जिल्ह्यात काही ठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यामध्ये एकूण १५ ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित करुन अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३)नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी प्रविणकुमार धरमकर यांनी दिले आहेत.

याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करण्यात आली आहे .

बीड तालुक्यातील वरवटी , वंजारवाडी , बेलुरा मोचीपिंपळगाव, इमामपुरा , तळेगाव व काकडहिरा, अंबाजोगाई (ग्रामीण) तालुक्यातील भाग्यनगर रिंग रोड (जोगाईवाडी ) व डोंगरपिंपळा, माजलगाव तालुक्यातील केसापुरी कॅम्प व तालखेडा, धारुर तालुक्यातील गोपाळपुर आष्टी तालुक्यातील केरूळ, शिरूर कासार तालुक्यातील आनंदनगर आणि पाटोदा तालुक्यातील माऊली नगर या गावांमध्ये कंटेनमेंट झोन ( Containment Zone) घोषित करण्यात आले आहे असे आदेशात नमूद केले आहे.

वरील संबंधित परिसरात अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येवून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहेत.

राज्य शासनाने लोक डाऊन कालावधी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 31 ऑगस्ट २०२० रोजीच्या रात्री १२ पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम (१) (३) लागू करण्यात आले आहेत.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published.