Home » माझी वडवणी » दंडाच्या नावाखाली दूचाकीस्वाराची पिळवणूक – संतोष पवार

दंडाच्या नावाखाली दूचाकीस्वाराची पिळवणूक – संतोष पवार

दंडाच्या नावाखाली दूचाकीस्वाराची पिळवणूक – संतोष पवार

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

वडवणी – सध्या कोरोनाचे सावट चालू असताना लोकांमध्ये भिती निर्माण झाली आहे.मात्र
वडवणी शहरातील वाहतूक शाखेत असलेले पोलीस कर्मचारी आघाव यांनी लोकाना वेठीस धरून चारसे ते सातशे रू दंड वसूल करण्याचा सपाटा सूरू केला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे युवक शहर अध्यक्ष संतोष पवार यांनी म्हटले आहे.

सध्या महाराष्ट्रासह देश भरा मध्ये कोरोना व्हायरस नावाच्या रोगाने थैमान घातले आहे. जनता दहशती खाली असताना पोलीस यंत्रणा देशाची योद्धा आहे. परंतु वडवणी शहरात वेगळेच चित्र बघायला मिळत आहे. खेड्या पाड्यातून लोकांना वडवणीत येताच जनतेच्या खिशाला कात्री लागत आहे. 400 ते 700 रू चा दंड बळजबरीने वसूल करत आहेत. असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे युवक शहर अध्यक्ष संतोष पवार यांनी केला आहे. यावर वरीष्ठ आधिकारी यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. दूचाकीस्वाराची पिळवणूक होत आहे. वाहतूक शाखेतील आघाव यांचा मनमानी कारभार असुन तोंड बघून ते गाड्या सोडत आहेत.जनता कोरोना मूळे मेटाकूटीस आली आहे. आणि ही बळजबरीची वसूली होत आहे. आपण ही बाब या मतदारसंघाचे आ.प्रकाश सोळंके यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे मत ही संतोष पवार यांनी व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.