शाब्बास साहेब – अँड.अजित देशमुख.
-डोंगरचा राजा / आँनलाईन.
– यवतमाळचे जिल्हाधिकारी सिंह यांची थेट रुग्णालयात जाऊन कोरोना रुग्णांशी चर्चा.
बीड – एम. देवेंदर सिंह, बीडचे माजी आणि यवतमाळ सध्याचे जिल्हाधिकारी यांनी आज यवतमाळ येथे थेट कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांबरोबर चर्चा केली. स्वतः साहेब रुग्णालयात आले म्हणलं की, रूग्णांना मोठा धीर आला. याबाबत आमची तेथील कार्यकर्त्यांबरोबर चर्चा झाली. साहेबांच्या येण्याने रुग्णही समाधानी झाले. जन आंदोलनाला हे कळल्यावर सिंह यांचे अभिनंदन केले असल्याचे अँड. अजित एम. देशमुख यांनी म्हंटले आहे.
जिल्हाधिकारी पदावरील व्यक्तीने असे थेट कोविड रुग्णालय गाठणे, आणि चर्चा करणे, हे समाधानकारक आहे. आजार हा मोठा असल्याने लोक घाबरले आहेत. अशात जर जिल्ह्याचा राजा समजला जाणारा जिल्हाधिकारी थेट रुग्णांची विचारपूस करीत असेल तर ते हिताचे ठरेल.
कोरोना बाबत आता जनता जागृत झाली पाहिजे. जनतेने पथ्य पाळले तर तो बळावणार नाही. लॉकडाऊन अथवा संचारबंदी हा काही इलाज नाही. पण जनता बंधने पाळत नसल्याने संचारबंदी सारखे हत्यार नाईलाजाने वापरावे लागते. त्यामुळे जनतेने आता नियम पाळावेत आणि कोरोना रोखण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन अँड. अजित देशमुख यांनी केले आहे.