दोन पत्रकारांवर खुनी हल्ला..
– डोंगरचा राजा / आँनलाईन.
पुणे – पत्रकार संरक्षण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने राज्यात पुन्हा एकदा पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना चिंता वाटावी एवढ्या वाढल्या आहेत.. गेल्या चार दिवसात राज्यात चार पत्रकारावर हल्ले झाले आहेत. म्हणजे रोज एका पत्रकारावर हल्ला होत आहे..
आज सायंकाळी पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र वडगाव कोशिंबे आणि साकोरे गावच्या हद्दीत असलेल्या घोड नदीत वाळू माफियांनी दोन पत्रकारांवर जीवघेणा हल्ला केला आहे.. प्रफुल्ल मोरे आणि सावंत अशी पत्रकारांची नावे आहेत.. प्रफुल्ल मोरे आपले प्राण वाचवून आले असले तरी सावंत यांचा अजून तपास लागला नाही..
या प्रकरणी आंबेगाव तालुका पत्रकार संघाने डी. के. वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक अधिकारयांशी चर्चा केली असून वाळू माफियांच्या मुसक्या आवळणयाची विनंती केली आहे.. त्यानंतर पोलिसांनी गतीने कारवाई केली आहे.. दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.. मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे या प़करणी जातीने लक्ष देत आहेत.. पुणे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर यांनी पत्रकारांवरील हल्लयाचा निषेध केला आहे..
मराठी पत्रकार परिषद तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या हल्लयाचा निषेध केला आहे..
मराठी पत्रकार परिषदेच्या प्रमुख पदाधिकरयांची आज बैठक झाली.. बैठकीत पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांबददल चिंता व्यक्त करण्यात आली.. तसेच वाढत्या हल्ल्यांच्या विरोधात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला..