Home » ब्रेकिंग न्यूज » बातमी छापली नाही” म्हणूनही जिवघेणा हल्ला..

बातमी छापली नाही” म्हणूनही जिवघेणा हल्ला..

बातमी छापली नाही” म्हणूनही जिवघेणा हल्ला..

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

हिंगोली – विरोधात बातमी छापली म्हणून पत्रकारांवर हल्ले होतात हे नेहमीचेच झाले आहे. मात्र आता बातमी का छापली नाही असा जाब विचार पत्रकारांवर हल्ले होऊ लागले आहेत..
घटना हिंगोली जिल्हयातील औढा नागनाथ येथील आहे. औढा येथील लोकमतचे प्रतिनिधी तथा हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष गजानन वाखरकर यांच्यावर खुनी हल्ला केला गेला आहे.. वाखरकर यांनी बातमी छापली नसलयाचा हल्लेखोरांना एवढा राग आला की, जिवे मारण्याच्या उद्देशानं वाखरकर यांच्या डोक्यावर लोखंडी सळयांनी हल्ला केला गेला.. जबर जखमी झालेल्या वाखरकर यांच्यावर हिंगोली च्या शासकीय रूग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना नांदेड येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची तब्येत आता बरी आहे..
वाखरकर यांच्या तक़ारीवरून भादवि ३२४,१४३,१४८,१४९,३२३,५०४,५०६, तसेच पत्रकार संरक्षण कायद्याच्या कलम ४ नुसार ४ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाखरकर यांच्यावरील हल्लयाचा हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघ, मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने निषेध केला आहे.. हललेखोरास तातडीने अटक करण्याची मागणी एस.एम.देशमुख यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे..
कोणती बातमी छापायची अथवा नाही याचा पूर्ण अधिकार पत्रकाराचा आहे.. असं असतानाही वेगवेगळी दबावतंत्र वापरून हव्या त्या बातम्या छापून आणण्याचा हितसंबंधी प़यत्न करीत असतात पत्रकार जेव्हा दबावाला बळी पडत नाहीत तेव्हा त्यांच्यावर शारीरिक हल्ले केले जातात.. अशा घटनांचा प्रत्येकानं समोर येऊन निषेध केला पाहिजे..

Leave a Reply

Your email address will not be published.