Home » ब्रेकिंग न्यूज » हिंगोलीत रॅपिड अँटीजन टेस्ट होणार

हिंगोलीत रॅपिड अँटीजन टेस्ट होणार

हिंगोलीत रॅपिड अँटीजन टेस्ट होणार

– संतोष मानकर / हिंगोली

– शहर व शहरानजीकच्या ग्रामीण भागातील व्यावसायिकांची
रॅपिड अँटीजन टेस्ट होणार

हिंगोली – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता संपूर्ण हिंगोली जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी हद्दीतील सर्व प्रकारच्या हालचालीस दिनांक 5 ऑगस्ट रोजी रात्री 12.00 वाजल्यापासून दिनांक 19 ऑगस्ट रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंतच्यां कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. या कालावधीत हिंगोली शहर व नजीकच्या ग्रामीण भागातील सर्व कृषि सेवा केंद्र मालक, हिंगोली शहर व नजीकच्या ग्रामीण भागातील सर्व औषधी विक्रेते, हिंगोली शहर व नजीकच्या ग्रामीण भागातील सर्व भाजी व फळ विक्रेते, हिंगोली शहर व नजीकच्या ग्रामीण भागातील सर्व किराणा दुाकन मालक यांची पुढील दोन तीन दिवसांत रॅपीड अँटीजन टेस्ट सुरु करण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे. ही टेस्ट करण्यासाठी विविध विभाग यांना जबाबदारी नेमूण देण्यात आलेली आहे.
सदरील टेस्ट साठी काही भागातील नागरिक विरोध करीत असल्याचे यापूर्वी दिसून आले आहे. हिंगोली शहर वासियांनी रॅपिड अँटीजन टेस्ट साठी विरोध करु नये, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांनी केले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published.