Home » महाराष्ट्र माझा » तंटामुक्त गाव अभियान पुनः सुरू करा – करडीले

तंटामुक्त गाव अभियान पुनः सुरू करा – करडीले

तंटामुक्त गाव अभियान पुनः सुरू करा – करडीले

– संतोष मानकर / हिंगोली 

हिंगोली – आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना 2007 साली स्व.राज्याचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांनी चालु केलेली महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान योजना पुनः सुरू करण्याची मागणी औंढानागनाथ युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी करडीले यांनी केली आहे.

महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहमंत्री स्व.आर आर पाटील यांनी दि.15 ऑगस्ट 2007 रोजी ग्राम तंटामुक्ती योजना सुरू केली होती.
गावातील छोट मोठे वाद गावातच मिटायला हवे पोलिसांचा तान कमी व्हावा, एकमेकांशी संवाद वाढुन गावातील वाद गावातच मिटावेत जनतेच्या न्यायालयात होणारे हेलपाटे वाचावे अशी अपेक्षा ठेऊन महात्मा गांधी तंटामुक्ती योजना सुरू केली होती.
व प्रतेक गाव तंटामुक्त होण्यास सुरुवात झाली कित्येक गावानी खुप चांगले काम केले ,हजारो तंटामुक्त गावांना सरकारने पुरस्कार दिले त्यामुळे गावागावात संवादातुन चांगले वातावरण निर्माण झाले व गुन्ह्याचे प्रमाणही कमी होते.
नंतर सत्ताबद्दल झाले व फडणीस सरकारने व ही योजना बंद करून टाकली व या योजनेच्या पुरस्काराची रक्कम मुद्दाम दुसरीकडे वळविली व या योजनेला अडगळीत टाकले
राज्यातील जागृक तंटामुक्त अध्यक्ष यांनी सरकारला विनंती पन केली होती कि प्रलंबित पुरस्कार जाहीर करून वाटप करण्यात यावे पन फडणीस साहेबांच्या मते हि योजना चालू राहिल्यास आपले नुकसान होईल असे वाटले व त्यानी ही योजना बंद करून टाकली
जनतेच्या भल्यासाठी हि योजना चालू होणे आवश्यक असल्याचे निवेदनातुन मुख्यमंत्री साहेबांना सांगितले
गाव सुखी तर देश सुखी त्यामुळे हि योजना सुरू होने अतिशय आवश्यक आहे.अशा आशयाचे निवेदन औंढानागनाथ युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बालाजी करडीले यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.