Home » ब्रेकिंग न्यूज » हिंगोली जिल्ह्यात नवीन 05 रुग्ण.

हिंगोली जिल्ह्यात नवीन 05 रुग्ण.

हिंगोली जिल्ह्यात नवीन 05 रुग्ण.

– हिंगोली / संतोष मानकर

– 09 जणांना डिस्चार्ज; 161 रुग्णांवर उपचार सुरु.

हिंगोली – जिल्ह्यात 05 नवीन कोविड-19 चे रुग्ण आढळून आले असून 09 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी माहिती दिली आहे.
नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये एन.टी.सी. तापडीया ईस्टेट, हिंगोली येथील 03 व्यक्ती, काबरा जिनिंग जवळा पळशी रोड, हिंगोली येथील 01 व्यक्ती आणि बाराशिव ता. वसमत येथील 01 व्यक्ती असे एकुण 05 जणांना कोविड-19 ची लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे .
तर बरे झालेले रुग्णांमध्ये आयसोलेशन वार्ड, सामान्य रुग्णालय,हिंगोली येथील 02 , कोरोना केअर सेंटर वसमत येथील 02 आणि कोरोना केअर सेंटर लिंबाळा येथील 05 असे एकूण 09 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जिल्ह्यात कोविड-19 चे एकूण 598 रुग्ण झाले असून त्यापैकी 430 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 161 रुग्णांवर उपचार चालू आहेत. तसेच कोवीड-19 मुळे 07 व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.