Home » माझा बीड जिल्हा » अंन्टीजन  टेस्ट वाढवा- प्रवक्ते कुलकर्णी.

अंन्टीजन  टेस्ट वाढवा- प्रवक्ते कुलकर्णी.

अन्टीजन  टेस्ट वाढवा- प्रवक्ते कुलकर्णी.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

– कोरोना संकटाला रोखण्यासाठी बीड जिल्ह्यात अॅन्टीजन टेस्ट वाढवा-भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी

बोड – कोरोना संकटाने आता संपूर्ण बीड जिल्हाला घेरले असून बीड,परळी,गेवराई पाठोपाठ अंबाजोगाई शहरात ही उद्रेक सुरू झाला आहे.समुह संसर्ग सुरू झाला असून या संकटाला रोखायचे असेल तर अॅन्टीजन चाचण्यांची गती वाढवावी तसेच राज्य सरकारने त्यासाठी लागणारा निधी आणि मनुष्यबळ तात्काळ उपलब्ध करून द्यावे अशी मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.

या विषयावर आमच्या प्रतिनिधीशी बोलताना भाजपा राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी म्हटले आहे.की,या संकटात जो बीड जिल्हा सुरूवातीला ग्रीन झोन अर्थात मागे होता.तोच बीड जिल्हा आता रेडझोन झाला असून मोठ्या प्रमाणावर रूग्णांची दररोज वाढ होत आहे.600 पेक्षा अधिक रूग्ण निघाले असून 30 च्या जवळपास रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.जिल्हा प्रशासनाने बीड,परळी,गेवराई शहरात लॉकडाऊन प्रयोग करून देखिल बीड परळी शहरात रोज रूग्णांची संख्या वाढतच आहे.ग्रामीण भागात पण,या संकटाने पाय पसरले आहे.समुह संसर्ग बीड जिल्ह्यात सुरू झाला असून आता अॅन्टीजन चाचण्या वाढवण्याची गरज आहे.मुंबई,पुणे आणि औरंगाबाद आदी ठिकाणी टेस्टींग वाढवल्यामुळे रिकव्हरी रेट वाढल्याचे लक्षात येते ? तर मग बीड जिल्ह्यात का होत नाही हा सवाल त्यांनी केला.सध्या चाचण्या ज्या सुरू आहेत.त्या दिवसाला केवळ 400 प्रमाणे आहेत.जिल्ह्यात लोकसंख्या 25 लाखांपेक्षा जास्त असून रोज किमान पाच हजार टेस्टींग होणे गरजेचे आहे.शिवाय या टेस्ट तालुका पातळीवर करणे महत्वाचे आहे.राज्य सरकारने या कामासाठी निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी पण, त्यांनी केली आहे.खरे तर अशावेळी जिल्हा प्रशासनाने सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांची एखादी बैठक बोलावून विचारविनिमय करायला हवा.कारण,कोरोना विषाणु साथ आजाराचे संकट हे गंभीर होत चालले असून टेस्टींग गती वाढवणे हाच चांगला पर्याय असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.