पंतप्रधान मोदींकडे ना.आठवलेंची मागणी.
– डोंगरचा राजा / आँनलाईन
मुंबई – रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री डाॅ.रामदास आठवले यांनी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरन्नोत्तर ‘भारतरत्न’ या भारतीय लोकशाहीच्या सर्वोच्च पदाने सन्मानित करण्यात यावे अशी मागणी लेखी पत्राद्वारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली. त्याचबरोबर रिपाइं युवक प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी देखील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे मागणी केली असून निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील साहित्य क्षेत्रात अग्रगण्य नाव असलेले साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांचे 2020 हे जन्मशताब्दी वर्ष आहे.साहित्य क्षेत्रातील त्यांचं कार्य पहाता महाराष्ट्र शासनाकडून भारतरत्न पुरस्काराची शिफारस केंद्र शासनाकडे करावी अशी मागणी केली आहे.त्याच बरोबर कोकण प्रदेश अध्यक्ष तुषार कांबळे यांनी सुध्दा लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळणेसाठी आपण पाठपुरावा करावा अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.