मुख्यमंत्र्यांची मुलाखत;विनायक मुळेंच्या टिमकडुन सामनाचे वाटप
– डोंगरचा राजा / आँनलाईन.
वडवणी – शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आजच्या दैनिक सामना या प्रसिद्ध वर्तमान पत्रात मुलाखत आली असता वडवणी तालुका शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून 2100 दैनिक सामना पेंपर (अंक) वाटपाला सुरुवात करण्यात आली. या वेळी उपस्थित जेष्ठ पत्रकार सुभाष वाव्हळ,शिवसेना माजी तालुका प्रमुख विनायक मुळे, वडवणी चे माजी सरपंच गंपु पवार रिपाइं चे तालुका अध्यक्ष महादेव उजगरे, शिवसेना महिला आघाडीच्या प्रमीलाताई माळी, शिवसेना शहरप्रमुख नागेश डिगे, जेष्ठ शिवसैनिक बंडु जाधव, दत्ता आलगट, अभिनेते.शंकर आंधळे, वचिष्ट शेंडगे, मुन्ना पवार, राजेश चव्हाण, राजेश उजगरे,अशोक चाटे, उध्दव काकडे,धनंजय जाधव युवा सेना शहर प्रमुख भैय्या खोसे, हांनुमत शिंदे, संजय धपाटे, दिपक झाडे,संजय ईटकर, गणेश म्हेत्रे,शंकर झाडे, रवी बाकळे,गणेश डिंगे व इतर उपस्थित सर्वांनी. वडवणी शहरासह तालुक्यात एकुण 2100 दैनिक सामना या वृत्तपत्राच्या वाटपाचा शुभारंभ केला.