घाटातील दरडी कोसळण्याची भीती.
-अद्याप मंजुरी नाही – अँड.अजित देशमुख.
– डोंगरचा राजा / आँनलाईन.
– मांजरसुबा घाटातील दरडी कोसळण्याची आय.आर.बी. ला भीती
बीड – बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथील घाटातून रस्ता अत्यंत चांगला झाला आहे. मात्र घाटात दोन्ही बाजूने उंच असलेले डोंगर कधी ढासळतील आणि दगड कधी रस्त्यावर येतील, याची भीती आय.आर. बी. ला वाटत आहे. त्यामुळे आय.आर.बी. ने या ठिकाणी बॅरिकेट्स लावून काळजी घेतली आहे. दरम्यान हाय वे च्या स्थानिक अधिकाऱ्यांनी जन आंदोलनाच्या मागणीनंतर या डोंगराला जाळी लावण्यासाठी पाठवलेल्या प्रस्तावाला अद्यापही मान्यता दिलेली नाही. अशी माहिती जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी दिली आहे.
मांजरसुंबा येथील घाटात नॅशनल हायवे अँथोरिटी, नवी दिल्ली तर्फे रस्त्याचे काम करण्यात आलेली आहे. त्यामुळे या भागात घाट अस्तित्वालाही राहिलेला नाही. मात्र दोन्ही बाजूंनी उंच असलेले डोंगर आणि त्यावरील मोठ मोठे दगड मोकळे झालेले आहेत. पावसाने येथे कधीही अपघात घडेल, याबाबतची माहिती जन आंदोलनाने आय.आर.बी. च्या स्थानिक अधिकाऱ्यांना दिली होती.
या मागणीची दखल घेत स्थानिक अधिकाऱ्यांनी घाटात डोंगर दरडी ढासळू नये, यासाठी जाळी लावण्याचा प्रस्ताव नवी दिल्ली येथील कार्यालयाला पाठवला आहे. मात्र या प्रस्तावाला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. यात त्या अधिकाऱ्यांनी आणखी पाठपुरावा करावा आणि कसलाही अनुचित प्रकार करण्यापूर्वी जाळी लावण्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणीही अँड. देशमुख यांनी केली आहे.