Home » महाराष्ट्र माझा » स्वाभिमानीच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा.

स्वाभिमानीच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा.

स्वाभिमानीच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

– विश्व मराठा संघा चा ‘ स्वाभिमानी ‘ च्या दूध बंद आंदोनला जाहीर पाठिंबा.

– स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खा राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली पुकारलेल्या दूध बंद आंदोलनला विश्व मराठा संघाचा जाहीर पाठिंबा.
आज विश्व मराठा संघाची ऑनलाईन बैठक पार पडली या बैठकीमध्ये खासदार राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी दूध बंद आंदोलनाला पाठिंबा देण्याची चर्चा झाली यामध्ये विश्व मराठा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री शेखर पाटील, प्रदेशाध्यक्ष प्रशांत दादा भोसले ,महिला प्रदेशाध्यक्ष छायाताई भगत, पुणे जिल्हा अध्यक्ष अंकुशराजे जाधव,जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत तांगडे पाटील व इतर सर्व पदाधिकारी यांच्या सर्वानुमते पाठिंबा जाहीर केला.
सध्या राज्यात गाईच्या दुधाचा दर 17 ते 18 रुपये लिटर आहे परंतु पाण्याच्या बॉटलचा दर वीस रुपये आहे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था ही दुधावर अवलंबून आहे कोट्यावधी छोटे शेतकरी दूध व्यवसायशी संबंधित आहेत मात्र दुध दर कमी झाल्यामुळे त्यांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे त्यामुळे दूध दरात वाढ होणे गरजेचे आहे सरकारने यावर लवकरात लवकर निर्णय घेऊन दूध दरवाढ करावी अथवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षतेखाली राज्यभर विश्व मराठा संघातर्फे महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी माहिती विश्व मराठा संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत तांगडे पाटील यांनी दिली

Leave a Reply

Your email address will not be published.