मिड-डे ने 40 जणांना घरी बसविले..
– डोंगरचा राजा / आँनलाईन.
मुंबई – मिड डे या लोकप्रिय सायं दैनिकाने आज 40 कर्मचारयांना घरी बसविले .. कंपनीने जी रिट़ैचमेंट नोटीस बजावली आहे त्यात नेहमीचेच रडगाणे गायले आहे.. इलेक्ट्रॉनिक मिडियाशी स्पर्धा करावी लागत असल्याने कंपनीच्या जाहिरातीवर आणि खपावर परिणाम झाला होता.. त्यातच 24 मार्चपासून लॉकडाऊनमुळे पुन्हा जाहिराती कमी झाल्या, खप कमी झाल्याने आणि कंपनी मजिठियानुसार वेतन देत असल्याने कंपनी मोठ्या आर्थिक संकटात सापडली.. त्यामुळे काही कर्मचारयांना कमी करावे लागत असल्याची नोटीस कंपनीने बजावली आहे..
एका मराठी चॅनलनं देखील अलिकडेच सात पत्रकारांना घरी पाठविले आहे..मिड डे हे मुंबईतील मोठा खप असलेले आणि चांगल्या जाहिराती मिळविणारे सायंदैनिक आहे..
मिड डे प़माणे च अन्य दैनिकं आणि चॅनलसनयमधूनही मोठ्या प्रमाणात कर्मचारी, पत्रकार कपात सुरू असल्याने मिडियात मोठ्या प्रमाणात घबराट पसरली आहे.. सगळे नियम आणि कायदे कानून धाब्यावर बसवून रिट़ैचमेंट सुरू असल्याने सरकारने याची दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेने केली आहे.. सरकारने तातडीने हस्तक्षेप करीत सरकार, माध्यमांचे मालक आणि पत्रकार संघटनांचे प्रतिनिधी यांची एक त्रीपक्षीय बैठक बोलावून सध्याच्या परिस्थितीतून मार्ग काढावा अशी मागणीही परिषदेने केली आहे..