Home » माझी वडवणी » सीबीएसईमध्ये मयुरेश्वर चे यश..

सीबीएसईमध्ये मयुरेश्वर चे यश..

सीबीएसईमध्ये मयुरेश्वर चे यश..

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

बीड- सीबीएसई पॅटर्न मधुन दहावी परिक्षेत सुमारे ९५टक्के गुण मिळवून वडवणी येथील डाॅक्टर विजयकुमार निपटे यांचा मुलगा चि. मयुरेश्वर विजयकुमार निपटे याने यश मिळवले आहे. त्याचे सर्वञ कौतुक होत आहे.
मयुरेश्वर विजयकुमार निपटे हा बीड येथील पोतदार विद्यालयात शिक्षण घेत होता. दहावी परिक्षेत यशाची उतुंग झेप घेऊन त्याने सीबीएसई पॅटर्न मधुन दहावी परिक्षेत सुमारे ९५टक्के गुण मिळवून नावलौकिक मिळविले आहे. त्याचे वडील डाॅक्टर विजयकुमार निपटे हे वडवणी तालुक्यातील प्रसिद्ध डाॅक्टर आहेत. मागील वीस वर्षाच्या वैद्यकीय सेवेत मयुरेश्वर हाॅस्पीटलच्या माध्यमातून हजारो रूग्णांना पिडामुक्त केले आहे. वडीलाप्रमाणेच डाॅक्टर होऊन रूग्णसेवा करण्याचा निर्णय मयुरेश्वर विजयकुमार निपटे याने घेतला आहे. त्याच्या यशाबद्दल त्याचे सर्वञ कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.