Home » माझा बीड जिल्हा » राज्यव्यापी उपक्रमाचे स्वागत – कांबळे.

राज्यव्यापी उपक्रमाचे स्वागत – कांबळे.

राज्यव्यापी उपक्रमाचे स्वागत – कांबळे.

– रविकांत उघडे / माजलगाव

– साहित्यरत्न कॉ .अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ऑनलाईन वेबीनार व्याख्यानमाला

– कॉंग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या राज्यव्यापी उपक्रमाचे स्वागत –दत्ता कांबळे

माजलगाव – लोकशाहीर साहित्यरत्न कॉ .अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कोरोना १९च्या प्रादुर्भावामुळे जाहीर कार्यक्रम घेणे शक्य नसल्याने , ऑनलाईन माध्यमातून दि .१८ जुलै ते ३१ ऑगस्ट पर्यंत व्याख्यानमाला महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी अनु .जाती विभागाच्या वतीने घेतल्या जाणार असून या ऑनलाईन व्याख्यानमाला मध्ये डॉ .शरद गायकवाड , खा .कुमार केतकर , मधुकर भावे , हरि नरके व सुरेश द्वादशिवार यांच्या सारखे विचारावंत वेबिनारद्वारा उद्बोधन करणार असल्याची माहिती या विभागाचे प्रदेशाध्यक्ष विजय आंभोरे यांनी पत्रकार परिषदेद्वारा कळवले असून जिल्हा कॉंग्रेस कमिटी अनु .जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता कांबळे यांनी या सामाजिक उपक्रमाचे स्वागत करत समाजाने या अमूल्य उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केलं आहे .
तसेच या वेबिनारचे पहिले पुष्प लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त गुंफन्यात येणार असून , प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत डॉ .शरद गायकवाड यांचे ”अण्णाभाऊ साठे :व्यक्तीमत्व व कर्तुत्व ‘ ‘ या विषयावर व्याख्यान होणार असून या व्याख्यानमालेचे उदघाटन कॅबिनेट मंत्री तथा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब थोरात हे करणार असून , अखिल भारतीय कॉंग्रेस अनु जाती विभागाचे अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री नामदार डॉ .नितीन राऊत हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत , तसेच प्रमुख पाहुणे म्हणून या विभागाचे राज्य प्रभारी मनोज बागडी सह मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे विभागाचे जिल्हाकार्याध्यक्ष दत्ता कांबळे यांनी कळवले आहे .तसेच प्रदेशाध्यक्ष विजय आंभोरे यांच्या संकल्पना मधून साजरा होत असलेला जन्मशताब्दी मोहोत्स्व समाजाच्या कायम आठवणीत राहील व आपण या राज्यव्यापी सामाजिक उपक्रमाचे जाहीर स्वागत करत असून हा उपक्रम समाजाने फेसबुक , व्हाट्सआप , इंस्टग्राम , टिविटर ,झूम अप सह यू टूब सारख्या सामाजिक माध्यमातून सर्वस्तरातूण कॉंग्रेस सह सर्व सामाजिक व आंबेडकरी पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांनी यात सहभागी होऊन वेबिनार व्याख्यानमालेचा आस्वाद घ्यावा व जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी वेबिनारमध्ये सहभागी व्हावे असे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता कांबळे यांनी आवाहन केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.