Home » ब्रेकिंग न्यूज » बारावीचा निकाल उद्या; महाराष्ट्र बोर्डाची घोषणा.

बारावीचा निकाल उद्या; महाराष्ट्र बोर्डाची घोषणा.

बारावीचा निकाल उद्या; महाराष्ट्र बोर्डाची घोषणा.

– केज /शरद गिराम.

फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या 12 वी परिक्षेचा निकाल उद्या लागणार आहे. याची घोषणा राज्य उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने केली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल उद्या, 16 जुलै 2020 रोजी जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्सवर हा निकाल विद्यार्थी-पालकांना पाहता येईल. याबाबतची अधिकृत माहिती नुकतीच देण्यात आली आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर बारावीचा निकाल पाहता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.