Home » माझा बीड जिल्हा » डीसीसी अन्याय करू नका – अँड. अजित देशमुख.

डीसीसी अन्याय करू नका – अँड. अजित देशमुख.

डीसीसी अन्याय करू नका – अँड. अजित देशमुख.

-डोंगरचा राजा / आँनलाईन.

– डीसीसी बँकेने सत्तावन्न हजाराच्या पीक कर्जातून सहा हजार रुपये भाग भांडवल म्हणून कपात केले.

बीड – पिक कर्ज घेण्यासाठी सध्या शेतकरी बँकांमध्ये चकरा मारत आहेत. बँकांकडून नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांची पिळवणूक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यातच शेतकऱ्यांची कणा समजली जाणारी जिल्हा बँक शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. जिल्हा बँकेने एका शेतकऱ्याला दिलेल्या सत्तावन्न हजार रुपये मधून पाच हजार सातशे रुपये भांडवल व तिनशे रुपये खर्च असे सहा हजार रुपये कपात केले आहेत. ही बाब अन्याय कारक असून डीसीसी बँकेने असा गोंधळ घालू नये, असे आवाहन जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित एम. देशमुख यांनी केले आहे.

पेंडगाव तालुका बीड येथे हा प्रकार घडला आहे. या गावातील शेतकऱ्यांच्या नावावर असलेल्या शेतीपेक्षा कमी क्षेत्र असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे कर्ज मंजूर करताना आहे त्या क्षेत्रावर कर्ज न देता कमी क्षेत्रावर कर्ज देण्यात आलेले आहे. शेतकऱ्याचे सिबिल तपासण्यात आलेले आहे. तपासनीसाच्या अहवालानंतर शेतकऱ्यांना जिल्हा बँकेने कर्ज मंजूर केले आहेत.

काही शेतकऱ्यांना सत्तावन्न हजार रुपये पीक कर्ज मंजूर करण्यात आले आहे. या रकमेतून मधून दहा टक्के म्हणजे पाच हजार सातशे रुपये एवढी रक्कम भांडवल म्हणून कपात करण्यात आली आहे. तर कर्ज प्रकरण करण्या बद्दलच्या खर्चाबाबत चार्जेस म्हणून तीनशे रुपये कपात करण्यात आली आहे. म्हणजेच सत्तावन्न हजार रुपयाच्या कर्जातून सहा हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे.

तीन-चार वर्षांपूर्वी जिल्हा बँकेकडे चारशे कोटी रुपयांच्या पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले जात होते. मात्र आता हे उद्दिष्ट शंभर कोटींवर आणले आहे. तरीही बँक शेतकऱ्याला त्रासदायक ठरत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भाग भांडवल म्हणून पीक कर्जातून रक्कम काढणे पूर्णपणे चुकीचे आहे. प्रत्येक कर्जातून जर अशी रक्कम कपात केली जात असेल, तर शंभर कोटीच्या कर्ज वाटपातून दहा कोटी रुपये भांडवल म्हणून पुन्हा बँक आपल्या खात्यात जमा ठेवू शकते आणि ही रक्कम पुन्हा घोटाळे घालण्यासाठी वापरात आणू शकते.

या प्रकाराकडे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी लक्ष घालायला हवे. प्रत्येकाच्या पीक कर्जातून दहा टक्के रक्कम भाग भांडवल म्हणून कपात होत असेल तर ही बाब चुकीची आहे. शेतकऱ्यांवर हा मोठा अन्याय असून शेतकऱ्यांना तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे. त्यामुळे याकडे जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.