Home » ब्रेकिंग न्यूज » आठ लाख रुपयाचा गुटखा पकडला

आठ लाख रुपयाचा गुटखा पकडला

आठ लाख रुपयाचा गुटखा पकडला

– रविकांत उघडे / माजलगाव

– माजलगावच्या गुटखा माफियाचा पुन्हा 8 लाख रु चा गुटखा पकडला
एल सी बी ची कारवाई

माजलगाव – शहरातील प्रमुख गुटखा माफिया असलेल्या एकाचा 8 लाख रु चा गुटखा मंगळवारी रात्री 12 वाजता समता कॉलनी येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकातील एपीआय आनंद कांगुणे यांच्या टीमने पकडला.याबाबत अन्न व औषध प्रशासन चे अधिकारी येऊन आज सायंकाळी गुन्हा दाखल करतील
गढी-माजलगाव मार्गे गुटख्या ने भरलेला पिकअप येणार असल्याची माहिती खबऱ्या मार्फत एल सी बी पथकास मिळाली होती.संभाजी चौकात दबा धरून बसलेल्या एल सी बी च्या पथकाने पिकअप येताच पाठलाग करून ८ लाखाचा गुटखा जप्त केला. ही कारवाई रात्री १२ वा.करण्यात आली.

माजलगाव-गढी रोडवर पिकअप क्र.एम.एच. ४४-९३०१ रात्री १२ वा. गढी येथून माजलगावकडे गुटखा घेऊन येत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक प्रमुख आनंद कांगुणे यांना मिळाली यावरून त्यांनी त्या पिकअपचा पाठलाग करत माजलगाव येथील समता कॉलनी येथे पिकअप ताब्यात घेतला. यामध्ये ६ लाख ५८ हजार ९४४ रुपयांचा राजनिवास गुटखा, १ लाख ६४ हजार ७३६ रुपयांचा जाफरणी जर्दा तर ६ लाख रुपये किंमतीचा महिंद्रा बोलेरो पिकअप असा एकूण १४ लाख २३ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.अन्न व औषध प्रशासन चे अधिकारी आल्यानंतर गुन्हा दाखल होईल अशी माहिती शहर पोलीस ठाण्याचे ए पी आय अविनाश राठोड यांनी दिली

सदरील कारवाई पोलीस अधिक्षक हर्ष पोह पोलीस अधिक्षक विजय कबाडे, डीवायएस सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख एपीआय आनंद कांगुणे यांच्यासह त्यांच्या टिमने केली.

Leave a Reply

Your email address will not be published.