Home » माझा बीड जिल्हा » अधिकाऱ्यांना प्रवेश बंदी करा – माजी आ.केशवराव आंधळे

अधिकाऱ्यांना प्रवेश बंदी करा – माजी आ.केशवराव आंधळे

अधिकाऱ्यांना प्रवेश बंदी करा – माजी आ.केशवराव आंधळे

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

– बीडवरून अपडाऊन करीत असलेले अधिकारी कर्मचाऱ्यांना वडवणी शहरात प्रवेश बंदी करावी – माजी आमदार आंधळे

वडवणी – सध्या बीड शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना ची लागण होत आहे.वडवणी शहरात व तालुक्यात सध्या एकही कोरोना बाधित व्यक्ती नाही. परंतु बीड येथुन ये – जा करीत असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांच्यामुळे कोरोना होऊ शकतो. तालुका ठिकाणचे तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपरिषद, पोलीस स्टेशन, कृषी विभाग, शिक्षण विभाग, बांधकाम विभाग, एकात्मिक बालविकास केंद्र यातील जवळजवळ सर्वच अधिकारी, कर्मचारी हे बीडहुन अपडाऊन करीत आहेत. त्यांची संख्या 350 ते 400 पर्यंत आहे. खरं म्हणजे या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हेड कॉटर ला राहून कोरोना निर्मूलनासाठी काम करायचे असते. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक, मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर जिल्हा स्तरावरील अधिकारी रात्रंदिवस मेहनत घेऊन कोरोना मुक्तीसाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु तालुकास्तरावरील अधिका-यांना व कर्मचाऱ्यांना कसलेच सोयरसुतक नाही. सदरील अधिकारी कर्मचारी मुख्यालयाला राहात असल्याचे दाखवून हजारो रुपये घर भाडे घेतात. एक प्रकारे शासनाची आर्थिक फसवणूक करीत आहेत. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून घर भाड्यापोटी घेतलेली रक्कम वसूल करण्यात यावी. यातील बरेच अधिकारी कर्मचारी बीड शहरात कंटेनमेंट झोन मध्ये राहतात. बीड शहरात संचारबंदी लागू असतानाही हे सर्व लोक ये – जा करीत आहेत. त्यांच्यासाठी संचारबंदी चा नियम नाही का..? तरी शासनाने, प्रशासनाने त्वरित लक्ष घालून अशा अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करून मुख्यालयाला राहण्याची सक्ती करावी अशी मागणी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाव्दारे नमाजी आमदार केशवराव आंधळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.