Home » ब्रेकिंग न्यूज » शिक्षणाधिकारी कारवाई करणार का.?

शिक्षणाधिकारी कारवाई करणार का.?

शिक्षणाधिकारी कारवाई करणार का.?

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

– गटशिक्षणाधिकारी यांनी दाखल केला आर.टि.ई.अँक्टचे उल्लंघन केल्याचा चौकशी अहवाल.

वडवणी – तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा रामनाईक तांडा येथे सहशिक्षक असणारे प्रकाश डांबे हे सन 2019-20 मध्ये झालेल्या चार शिक्षण परिषदेच्या एकाही परिषदेस हजर नाहीत तसेच ते शाळेवर गैरहजर असतात व एकदाच अनुपस्थित असलेल्या दिवशीच्या सह्या करतात तसेच ते मानव विकास योजनेचे कामकाज नियमित शाळा सोडून बीड येथे जाऊन करतात तरी त्यांची प्रतिनियुक्ती कोणत्या कार्यालयाने केली याची लेखी किंवा तोंडी माहिती नाही तरी त्यांनी आर.टि.ई.अँक्ट 2009 च्या कलम 24(1), च्या खंड (3) नुसार नेमुन दिलेले शैक्षणिक कामात हलगर्जीपणा व कसूर केलेला आहे असा चौकशी अहवाल गटशिक्षणाधिकारी वडवणी यांनी शिक्षण अधिकारी (प्रा) जि.प.बीड यांना पाठविलेला आहे तरी ते काय कारवाई करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
वडवणी तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा रामनाईक तांडा येथे सहशिक्षक असणारे प्रकाश डांबे हे शाळेवर सतत अनुपस्थित असतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असुन ते आर.टि.ई.अँक्ट 2009 च्या कायद्याचे उल्लंघन करतात तरी त्यांच्या शैक्षणिक कामाची सखोल चौकशी करून अहवाल द्यावा अशी तोंडी सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बीड यांनी शिक्षण अधिकारी प्रा. जि.प.बीड यांना केल्यावरून त्यांनी गटशिक्षणाधिकारी वडवणी यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले यामध्ये चौकशीत डांबे हे सन 2019-20 या वर्षात झालेल्या चार शिक्षण परिषदेस शाळेवरील मस्टरवर सह्या करून गैरहजर राहिले तसेच केंद्र प्रमुख चिंचाळा यांनी दोन वेळेस शाळेला भेट दिली असता उपस्थिती रजिस्टर वर सह्या आहेत मात्र ते गैरहजर आढळून आले तसेच ते शाळेवर नेहमी गैरहजर असतात व एकदाच अनुपस्थित असलेल्या दिवशीच्या सह्या करतात तसेच ते शाळा वार्यावर सोडून मानव विकास योजनेचे काम बीडला जाऊन करतात तरी त्यांची प्रतिनियुक्ती मानव विकास कार्यालय बीड येथे कोणत्या कार्यालयाने केली याची लेखी व तोंडी माहिती या कार्यालयास नाही त्यामुळे सहशिक्षक डांबे यांनी आर.टि.ई.अँक्ट 2009 च्या कलम 24(1),च्या खंड (3) नुसार त्यांना नेमुन दिलेले शैक्षणिक काम करण्यात हलगर्जीपणा व कसुर केल्याचे चौकशी अहवालात उघड झालेले आहे तरी सहशिक्षक डांबे यांच्या वर मुख्य कार्यकारी अधिकारी ,शिक्षण अधिकारी (प्रा) बीड हे काय कारवाई करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागलेले आहे.
—————————
चौकट…

सहशिक्षक डांबे यांचा वरदहस्त कोण.

मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.बीड यांच्याकडे सहशिक्षक डांबे यांच्या आलेल्या तक्रारी वरून त्यांनी दि.18 मे रोजी शिक्षण अधिकारी(प्रा) बीड यांना चौकशी करून अहवाल देण्याची सुचना केली होती त्यानंतर शिक्षण अधिकारी (प्रा) यांनी दि.22 मे रोजी गटशिक्षणाधिकारी वडवणी यांना चौकशी करून अहवाल सात दिवसात सादर करण्याचे आदेश दिले होते तरी गटशिक्षणाधिकारी यांनी दि.1 जुलै रोजी चौकशी अहवाल सादर केला आहे तरी यामध्ये एक महिन्या पेक्षा जास्त वेळ का केला मंग डांबे यांना कोण पाठीशी घालत आहे व त्यांचा वरदहस्त नेमका कोण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.