Home » ब्रेकिंग न्यूज » पिसेगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या

पिसेगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या

पिसेगाव येथे गळफास घेऊन आत्महत्या

केज / प्रतिनिधी

केज – एका ३५ वर्षीय मजुराने आपल्या राहत्या घरात पत्र्याच्या आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना केज तालुक्यातील पिसेगाव येथे १० जुलै रोजी रात्री उघडकीस आली. आत्महत्या करण्यामागचे कारण स्पष्ट झाले नव्हते. प्रकाश भगवान लांडगे असे या आत्महत्या केलेल्या मजुराचे नाव आहे.
पिसेगाव येथील प्रकाश भगवान लांडगे ( वय ३५ ) हे दुसऱ्याच्या शेतात मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होते. १० जुलै रोजी पत्नी शेतात मजुरीने गेली होती. तर मुले ही बाहेर असताना सायंकाळी पाच वाजेच्या नंतर प्रकाश लांडगे यांनी आपल्या राहत्या घरातील पत्र्याच्या आडूला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री पत्नी व मुले घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. प्रकाश यांनी आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नव्हते. या घटनेची माहिती मिळताच केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या आदेशावरून जमादार दिनकर पुरी व पोलीस नाईक धनपाल लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. ११ जुलै रोजी सकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर प्रकाश लांडगे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. वसंत भगवान लांडगे यांच्या खबरेवरून केज पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस नाईक धनपाल लोखंडे हे पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.