छ.शिवाजी महाराज अवमान प्रकरणी गुन्हा दाखल करा – जाधव
– संतोष मानकर / हिंगोली
हिंगोली – अखंड हिन्दुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी एकरी भाषा वापरणाऱ्या आणि विनोदाचा भाग म्हणून उल्लेख करणाऱ्या स्टॅण्ड अप कॉमेडियन अग्रीमा जोशवा यांचा मराठा समाजात कडून सर्व प्रथम जाहिर निषेध करण्यात आहे.
एक कार्यक्रमात अग्रीमा जोशवा यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख करत, मुंबईत अरबी समुद्रामध्ये होणाऱ्या शिवस्मारका विषयी विनोद करत, सबंध महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत.
अग्रीमा यांनी सदर गोष्टीची लेखी आणि व्हिडिओ द्वारे पुढील 24 तासात माफी मागावी व पोलिसांनी राष्ट्रपुरुष अवमान प्रकरणी अग्रीमा जोशवा यांच्यावर गुन्हा दाखल करत कारवाई करावी, तसेच सदर व्हिडिओ सर्व सोशल मिडिया प्लॅटफोर्म वरुन काढून टाकण्याचे आदेश सायबर सेल ने द्यावे ही मागणी मराठा समाजामार्फत करण्यात येत आहे. करवाई न झाल्यास संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल.
आपणास विनंती आहे की सदर तक्रारारीची दखल घेत, आपण गुन्हा दाखल करुन घेत आपण अग्रीमा जोशवा व संबंधीतांवर योग्य ती आणि लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सह इतर मंत्री व जिल्हाधिकारी यांना हिंगोली चे देवानंद जाधव यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.