Home » माझा बीड जिल्हा » पप्पु कागदे यांच्या नेतृत्वाखाली उद्या यल्गार.

पप्पु कागदे यांच्या नेतृत्वाखाली उद्या यल्गार.

पप्पु कागदे यांच्या नेतृत्वाखाली उद्या यल्गार.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

– राजगृहा वरील हल्ला आणि राज्यात वाढत्या दलीत,बौद्ध अन्याय,अत्याचार प्रकरणी रिपाईचे उद्या पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रा सह बीड जिल्ह्यात आंदोलन.

महामानव,विश्वरत्न परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान ‘राजगृह’ ही दलीत,बौद्ध आणि तमाम बहुजनाची अस्मिता आहे, काही माथेफिरूंनी केलेली तोडफोड हा आमच्या अस्मितेवर केलेला भ्याड हल्ला आहे.या घटनेचा तीव्र निषेधार्थ व महाविकास आघाडी सरकारच्या काळात दलीत व बौद्धावर होत असलेल्या अन्याय,अत्याचाराच्या विरोधात उद्या महाराष्ट्र सह बीड जिल्हात पप्पुजी कागदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात तमाम दलीत,बौद्ध आणि बहुजनाची अस्मिता असलेले आमचे श्रद्धास्थान महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या “राजग्रह” येथे झालेल्या भ्याड हल्याच्या निषेर्धात व राज्यात मागासवर्गीय दलित आणि बौद्धांवर अन्याय अत्याचार वाढत आहेत.
लॉकडाऊन च्या काळातही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दलितांवर हल्ले होत आहेत,घरे जाळल्याचे दलित,बौद्ध तरुणांच्या हत्या झाल्याचे निषेधार्ह प्रकार घडलेत.
दलित आणि बौद्धांवर वाढत असलेले अत्याचार रोखण्याकडे राज्य सरकार अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.बौद्ध आणि दलितांवरील अत्याचार वाढत असताना ते रोखण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे.
दलित आणि बौद्धांना संरक्षण देण्याच्या मागणीसाठी तसेच दलित आणि बौद्धांवरील अत्याचारांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा प्रदेश अध्यक्ष पप्पु कागदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण महाराष्ट्रा सह जिल्हाभरात “निषेध आंदोलन”करण्यात येणार आहे.
उद्या (दि.११/०७/२०२०) रोजी संपूर्ण महाराष्ट्रा सह प्रत्येक जिल्हात जिल्हाधिकारी,तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्यां समोर आंदोलन करण्यात येणार आहे.
हे आंदोलन लोकशाही मार्गाने आणि प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करून शांततेच्या मार्गाने होणार आहे.
तरी सर्व कार्यकर्ते/पदाधिकारी यांनी सर्व नियमांचे काटेकोर पणे पालन करून आंदोलनात सहभागी व्हावे असे अावाहन रिपाई चे बीड तालुका अध्यक्ष किशन तांगडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.