Home » ब्रेकिंग न्यूज » हिंगोलीत कभी खुशी कभी गम..

हिंगोलीत कभी खुशी कभी गम..

हिंगोलीत कभी खुशी कभी गम..

– संतोष मानकर / हिंगोली

– आठ योध्याचा कोरोनावर विजय तर दोन नवे रुग्ण पॉझिटिव्ह

दिलासादायक ; आठ योध्याचा कोरोनावर विजय तर दोन नवे रुग्ण पॉझिटिव्ह.

हिंगोली – गुरुवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात लिंबाळा कोअर सेंटर येथील तीन, औंढा चार तर वसमत येथील एक असे आठ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. तर हिंगोली येथे हैद्राबाद वरून आलेला व वसमत येथे एक असे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असल्याने जिल्ह्यात कही ख़ुशी कही गम असल्याचे चित्र आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसो लेशन वॉर्ड अंतर्गत उपचार घेत असलेल्या४३ वर्षीय तरुण हा शहरातील गांधी चौक येथील नातेवाईकांकडे आला असून तो हैद्राबाद वरून गावी परतला आहे. तसेच वसमत क्वारंटाइन सेंटर येथील एका२५ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली असून तो वापटी येथील रहिवासी आहे. तो मुंबई येथून गावी परतला आहे.
गुरुवारी प्राप्त अहवालानुसार लिंबाळा येथील तीन रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये तालाब कट्टा एक, केंद्रा दोन, यांचा समावेश आहे. तर औंढा येथील कोअर सेंटर येथील चार रुग्ण बरे झाल्याने त्यांना  डिसचार्ज देण्यात आला आहे. यात औंढा दोन, भोसी दोन या रुग्णाचा समावेश आहे.तसेच वसमत येथील केअर सेंटर मधील रुग्ण बरा झाला आहे. असे एकूण आठ रुग्ण बरे झाले आहेत. तर दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे गुरुवारी जिल्हा प्रशासनाची चिंता दूर झाली आहे.आतापर्यन्त जिल्ह्यात कोरोनाचे ३१६ रुग्ण आढळून आले म्हणजेच त्रिशतकी आकडा पार केला आहे. त्यापैकी २७१ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. तर आजघडीला ४५ रुग्णावर उपचार सुरु असल्याचे डॉ. कुमार श्रीवास यांनी सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसो लेशन वॉर्डात एकूण अकरा कोरोना रुग्णावर उपचार सुरु असून यात रिसाला एक, मकोडी एक, बहिर्जी नगर दोन, गांधी चौक तीन, जीएमसी नांदेड एक, पेडगाव एक, शुक्रवार पेठ दोन यांचा समावेश आहे. याशिवाय वसमत येथील केअर सेंटर येथे नऊ कोविड रुग्ण दाखल असूनयामध्ये बहिर्जी नगर दोन,गणेश नगर एक, दर्गा पेठ एक,रिधोरा एक, टाकळगाव दोन,जयनगर एक, वापटी एक या रुग्णाचा समावेश आहे.तसेच कळमनुरी येथील कोरोना सेंटर येथे आठ रुग्णावर उपचार सुरु आहेत. यामध्ये बाभळी एक,विकास नगर दोन, नवी चिखली तीन, डिग्रस एक, शेवाळा एक या रुग्णांचा समावेश आहे.
तसेच लिंबाळा अंतर्गत सेंटर येथे बारा रुग्णावर उपचार सुरु आहेत. यामध्ये तालाब कट्टा दोन, प्रगतीनगर एक, भांडेगाव तीन, पिंपळखुटा एक, हनवतखेडा एक, कळमकोंडा चार यांचा समावेश असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.तर सेनगाव येथे तिघांवर तर औंढा येथे दोघांवर उपचार सुरु आहेत.
जिल्हा आयसोलेशन वॉर्ड व कोरोना केअर सेंटर आणि गावपातळीवर भरती केलेल्या रुग्णात एकूण ५५०६ रुग्णावर उपचार सुरु आहेत. त्यापैकी ५०३० रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.४७७२ रुग्णांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला ७२६ रुग्ण भरती असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यातील १९२ रुग्णांचे अहवाल येणे बाकी असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published.