Home » ब्रेकिंग न्यूज » शिपायाची मुलगी डॉक्टर झाली..

शिपायाची मुलगी डॉक्टर झाली..

शिपायाची मुलगी डॉक्टर झाली..

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

गंगाखेड सारख्या ग्रामीण भागात राहुन एका शाळेवर शिपाई म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीची मुलगी डॉक्टर बनली. नऊ जुलै रोजी तिने पुणे मनपा आरोग्य विभागात पदभार याची माहिती पालकांनी दिली.

डॉ. अश्विनी पांडुरंग होरे राहणार नरळद तालुका गंगाखेड जिल्हा परभणी असे या नवनियुक्त डॉक्टर चे नाव आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या बाळासाहेब होरे हे गंगाखेड शहरातील ममता विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत आहेत. याच शाळेत अश्विनीचे प्राथमिक शिक्षण झाले. माध्यमिक शिक्षण गंगाखेड व नांदेड तर वैद्यकीय शिक्षण सांगली जिल्ह्यात पूर्ण केले. वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रावराजुर ता. पालम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा दिली. काल पुणे महानगरपालिका आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली या निवडीबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

*माझी मुलगी कोरोणा योद्धा*
कोरोच्या काळात पुणे ,मुंबईसारख्या शहरातील गेलेले लोक गावाकडे पडत आहेत पण अशा काळातही आपण देशबांधवांच्या कामाला आलो पाहिजेत हा संकल्प मनात ठेवून मी माझ्या मुलीस पुण्यातील रुग्णांची सेवा करण्यासाठी कोरणा च्या काळातही तिला सेवेवर एक कोरोना योद्धा म्हणून पाठवीत असल्याचा मला अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया तिचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.