“राजगृह” ची तोडफोड कडक शिक्षा करा – शिवाजी ठोंबरे
– केज /शरद गिराम
केज -भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती व आठवणींना उजाळा देणाऱ्या दादर येथील” राजगृह” या निवासस्थानाची तोडफोड होणं हे अतिशय दुर्दैवी घटना आहे. रात्रंदिवस अभ्यास करून जगात सर्वात मोठी लोकशाहीचा आधार असणारी “राज्यघटन “निर्माण करणारे घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड भारतीय संस्कृतीला शोभणारी नाही .
शांत महाराष्ट्र मध्ये कोरोनाच्या धर्तीवर जातीय तेढ निर्माण करण्यासाठी जाणीव पूर्वक नीतीभ्रष्टा नराधमांना कडून केलेलं कृत्य असून या माघे समाजामध्ये तेढ निर्माण करून समाजातील शांतता भंग करण्याच्या हेतूने केलेली घटना आहे. या दुर्दैवी घटने माघील मुख्य सुत्रधार व हा अक्षम्य गुन्हा करणाऱ्या दोषींवर कठोरात कठोर शासन करण्यात यावे अन्यथा जिल्ह्यात मंत्र्यांना फिरू देणार नाही व तीव्र आंदोलन करणार असल्याची अशी मागणी छावा मराठा संघटनेचे जिल्हाप्रमुख शिवाजी ठोंबरे वतीने करण्यात आली आहे निवेदनावर हमीद शेख ,चंद्रकांत गिराम ,गणेश वैरागे,विकास पाटोळे, यांच्या स्वाक्षरी आहेत.