Home » महाराष्ट्र माझा » हिंगोली जिल्ह्यात 41.18 मि.मी.पावसाची नोंद.

हिंगोली जिल्ह्यात 41.18 मि.मी.पावसाची नोंद.

हिंगोली जिल्ह्यात 41.18 मि.मी.पावसाची नोंद.

– संतोष मानकर / हिंगोली

हिंगोली – जिल्ह्यात दि.6 जुलै, 2020 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकूण 41.18 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 08.24 मि.मी. पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 252.85 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर 29.41 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात दि. 06 जुलै, 2020 रोजी सकाळी 08.00 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुका निहाय पुढीलप्रमाणे आहे. यात (कंसात आतापर्यंतचा एकूण पाऊस) हिंगोली 10.71 (239.87) मि.मी., कळमनुरी 14.83 (216.15) मि.मी., सेनगांव 5.50 (292.04) मि.मी., वसमत 4.14 (195.44) मि.मी., औंढा नागनाथ 6.00 (320.75) मि.मी. पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी 252.85 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.
****

Leave a Reply

Your email address will not be published.