Home » ब्रेकिंग न्यूज » डिग्रस बंजारी कंटेनमेंट झोन घोषीत

डिग्रस बंजारी कंटेनमेंट झोन घोषीत

डिग्रस बंजारी कंटेनमेंट झोन घोषीत

– संतोष मानकर / हिंगोली

हिंगोली – कळमनुरी तालुक्यातील मौजे डिग्रस बंजारी येथे कोविड-19 चा रुग्ण आढळून आल्याने कोरोनाचा प्रादूर्भाव इतरत्र होवू नये यासाठी मौजे डिग्रस बंजारी गावाचे संपूर्ण क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. या परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. या परिसरातील सर्व आवश्यक त्या सेवा या आदेशान्वये बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांना आवश्यक त्या सेवा ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) चे कलम 188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
****

Leave a Reply

Your email address will not be published.