Home » ब्रेकिंग न्यूज » हिंगोली पत्रकारांची खा.सातव यांच्याकडे मागणी.

हिंगोली पत्रकारांची खा.सातव यांच्याकडे मागणी.

हिंगोली पत्रकारांची खा.सातव यांच्याकडे मागणी.

– हिंगोली / संतोष मानकर

हिंगोली – राज्यपाल नियूक्त विधानपरीषदे वर पञकाराचे नेते एस एम देशमूख यांची निवड करा मागणी साठी हिंगोली जिल्हा पञकार संघाचे शिष्टमंळाने काॕग्रेस आय चे नेते खा.राजीव सातव यांची भेट घेतली .राज्य सरकार कडे शिफारस करण्याची मागणी केली त्यांनी यांला सकारात्मक प्रतीसाद दिला.

मराठी पञकार परीषदेचे मुख्यविश्वस्त व पञकाराचे नेते एस एम देशमुख यांना विधान परिषदेवर नियुक्त करावे या मागणी करता अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यकारणी सदस्य खासदार ॲड. राजीव सातव यांना हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल उपाध्यक्ष दिलीप खोडके कळमनुरी तालुका अध्यक्ष अलीमोद्दीन कादरी, संजय शितळे यांनी निवेदन देऊन श्री एस एम देशमुख त्यांच्या नावाची काँग्रेस पक्ष कडून शिफारस करावी असा आग्रह धरला तसेच मराठी पत्रकार परिषद च्या शृंखलाबद्ध संघटनेने राज्यभरात जिल्हा , तालुका व गाव स्तरापर्यंत पत्रकार जोडले गेलेले असून काँग्रेस पक्षाला पण भविष्यात त्याचा फायदा होऊ शकतो असे सांगितले त्यावर खासदार सातव यांनी व्यक्तिशः एस. एम. देशमुख यांचे करीता आपण प्रयत्न करणार असून त्यांच्याशी माझे घनिष्ठ संबंध आहेत असे सकारात्मक आश्वासन खा.राजीव सातव यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published.