Home » ब्रेकिंग न्यूज » 31जुलैपर्यंत बंद;शिक्षणाधिकारी.

31जुलैपर्यंत बंद;शिक्षणाधिकारी.

31जुलैपर्यंत बंद;शिक्षणाधिकारी.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

– बीड जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालय 31 जुलैपर्यंत बंदच.

बीड – जिल्ह्यातील नववी,दहावी आणि बारावीचे वर्ग दिनांक 06 जुलै 2020 पासून सुरू करण्याचे आदेश बीड जिल्हा शिक्षण विभागाने काढले होते.मात्र महाराष्ट्र शासनाने लाॅकडाऊन कालावधी दिनांक 31 जुलै पर्यंत वाढविल्यामुळे बीड जिल्ह्यातील सर्व शाळा,कनिष्ठ महाविद्यालय दिनांक 30 जुलै 2020 पर्यंत बंद राहतील असे आदेश आज दिनांक 3 जुलै रोजी प्राथमिक शिक्षणाधिकारी अजय बहीर व माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश खटावकर यांनी संयुक्तरित्या काढले आहेत.

बीड जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपल्या शाळा-महाविद्यालयात उपस्थित राहून ऑनलाइन पद्धतीने अभ्यासक्रम पूर्ण करणे.स्वतःचे ज्ञान वाढविणे, शैक्षणिक व कार्यालयीन कामे इत्यादी कामकाज करावे. अशा सूचना देण्यात आल्या आहेत. महिला शिक्षिका, मधुमेह श्वसनाचे विकार असलेल्या हृदय विकार इत्यादी सारखे गंभीर आजार असलेले व 55 वर्षावरील पुरुष शिक्षकांना शाळेमध्ये न बोलविता त्यांना प्रत्यक्ष शाळा सुरू होण्याच्या कालावधीपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात वर्क फ्रॉम होम ची सवलत देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अजय बहिर, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश खटावकर यांनी संयुक्तरीत्या काढले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.