Home » महाराष्ट्र माझा » मानव विकासच्या कामांची चौकशी ठप्प.?

मानव विकासच्या कामांची चौकशी ठप्प.?

मानव विकासच्या कामांची चौकशी ठप्प.?

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

– मुख्याधिकारी,शिक्षणाधिकारी यांनी दोषींवर कारवाई करावी.

वडवणी – तालुक्यात गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी जिल्हा परिषद शाळेला डिजिटल शाळा करण्याकरिता मानव विकास मिशन अंतर्गत लाखों रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. मात्र सदर शाळांमध्ये ही योजना कोठेही राबविण्यात आली नसल्याचे उघड झाले आहे.तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान करून ऊसतोड मजुरांच्या मुलांची गरीब विद्यार्थी,विद्यार्थिनीसाठी आलेला निधी कामे न करताच हडप करणा-या दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर आरटीआय अॅक्ट नुसार कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,
मानव विकास आयुक्तालया मार्फतच्या गोरगरीब विद्यार्थी-
विद्यार्थिनीसाठी‌ शासकीय योजना अनेक आहेत.मात्र वडवणी तालुक्यातील विविध शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने गोरगरीब विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे सामाजिक,आर्थिक,
शैक्षणिक नुकसान झाले आहे.
सन 2019 मध्ये( 74 94 616) अक्षरी 74 लाख 94 हजार 616 रूपये निधी आला होता. हा निधी बीडीएस प्रणालीद्वारे शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद बीड यांना वितरित करण्यात आला होता.याबाबत जि.प.सदस्या वडवणी यांनी लेखी माहिती मागवली असता गटशिक्षणाधिकारी यांनी लेखी माहिती दिली की आतापर्यंत जि.प.शाळांवर कुठल्याही प्रकारचे काँप्यूटर,सीसीटीव्ही किंवा इंटरनेटचे कसलेही विकास कामे झाले नसल्याचे नमूद केले.मग हा निधी गेला कुठे..? असा प्रश्न पडतो. या कामात लाखों रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याचे उघडकीस झाले आहे.या प्रकरणात बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी तातडीने चौकशी करून संबंधितांवर
मानव विकास मिशन अंतर्गतच्या ज्या कांही योजना आहेत. त्या योजना मधील दोषी अधिकाऱ्यांवर व कर्मचा-यांवर आरटीआय अॅक्ट नुसार कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.
—————————————-

कोट…
१) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मॅसेज..
—————————–
बीड जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अजित कुंभार यांना फोन वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.
सदर प्रकरणाबाबतचा मॅसेज त्यांच्या 7507338844 या वाटस अप नंबर वर पाठवुन माहिती देण्यात आली आहे.
—————————————-
२) परवानगी मिळताच काम सुरू करु.
—————–
जिल्हा परिषद शाळा डिजिटल करण्यासाठी सन 2018 – 19 मध्ये निधी आला आहे. कोरोनामधील लाॅकडाऊन असल्यामुळे व शाळा बंद असल्याने सदर निधी मार्च पर्यंत खर्च न झाल्याने तो निधी खर्च करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडून परवानगी मागितलेली आहे. परवानगी मिळताच काम सुरू करण्यात येईल..

– श्री.अजय बहीर
शिक्षणाधिकारी,जिल्हा परिषद माध्यमिक विभाग बीड

—————————————-

3) – गटशिक्षणाधिकारी फोन उचलत नाहीत.
———————–

वडवणी येथील गटशिक्षणाधिकारी पटेल मॅडम यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधुन या बाबतीत माहिती घेण्याचा प्रयत्न केला.मात्र फोन खणखणला दिवसभरात तो उचललाच नाही..

Leave a Reply

Your email address will not be published.