Home » माझी वडवणी » कवडगांवात पावसाचा कहर.?

कवडगांवात पावसाचा कहर.?

कवडगांवात पावसाचा कहर.?

– सलमान पठाण / कवडगांव

– मोरेवाडी पुलाचा पर्यायी रस्ता वाहुन गेल्याने वडवणीचा संपर्क तुटला.

– कोवळ्या पिकाचे अतोनात नुकसान;पंचनामे करण्याची मागणी.

कवडगाव – वडवणी तालुक्यातील कवडगाव बू.परिसरात गेल्या आठदिवसापासुन दररोज मुसळधार पाऊस कोसळत आहे आज दि.३जुलै रोजीही सुमारे दिड तास मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे मोरेवाडी नजीकच्या पुलाचा पर्यायी रस्ता वाहुन गेल्याने कवडगाव-वडवणी संपर्क तुटला आहे तर दररोजच्या पावसामुळे खरीपातील कोवळ्या पिकाची नासाडी झाली आहे तरी शासनाने या भागात येऊन प्रत्यक्ष पाहणी करुन पंचनामे करावेत आशी मागणी शेतकरी वर्गाकडुन होत आहे या बाबत अधिक वृत्त आसे कि यंदाच्या वर्षी मृग नक्षत्रात पाऊस सुरु झाल्याने शेतकरी आंनदी झाला होता मिरगी पेर ही आत्यंत महत्त्वाची मानली जाते.त्यामुळे शेतकर्यानी सावकाराकडुन पैसे घेऊन आपल्या जमिनीत कापुस तुर उडीद सोयाबीन आदी पिकाची लागवड केली मात्र या परिसरात गेल्या १५दिवसापासुन दररोज मोठा पाऊस होत आहे त्यामुळे शेतीच्या मशागतीची कामे ठप्प झाली आहेत दरम्यान दररोज पडणाऱ्या पावसामुळे मोरेवाडीच्या पुलाचे कामही ठप्प झाले आहे या पुलाचे काम चालु आसल्याने वाहतुकिसाठी तयार करण्यात आलेला पर्यायी रस्ता वाहुन गेल्याने वडवणीचा संपर्क तुटला आहे सततच्या पावसामुळे या पुलाचे कामही करता येईनाशे झाले आहे त्या मुळे कवडगाव परिसरातील जनता हैराण झाली आहे आज दि.३जुलै रोजी दुपारी ४ते६या वेळेत कवडगाव परीसरात धुव्वाधार पाऊस झाला यापावसामुळे परीसरातील सखल भागासह नदी नाले शेतरस्ते वाहुन गेले आहेत तर शेतातील उभ्या पिकाची संपुर्ण नासाडी झाली आहे त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे तरी प्रशासनाने या भागात येऊन प्रत्यक्ष पाहणी करुन तत्काळ पंचनामे करुन शेतकर्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.