Home » माझा बीड जिल्हा » एका हॉटेल चालकासह आठ पानटपरी धारकांवर गुन्हा दाखल.

एका हॉटेल चालकासह आठ पानटपरी धारकांवर गुन्हा दाखल.

एका हॉटेल चालकासह आठ पानटपरी धारकांवर गुन्हा दाखल.

– केज / शरद गिराम

केज – पोलिसांच्या वतीने मुख्य रस्त्यावर सायंकाळी 4 ते 6 दरम्यान संचारबंदी दरम्यान गस्त सुरू असताना शहरातील रोडवरील आठ टपरी धारक व एका हॉटेल चालकाने आपल्या पान टपरी व हॉटेल सुरू ठेवून पान मसाला विक्री चालू ठेवल्याचे निदर्शनास आले. यामध्ये पोलीस स्टेशन समोरील एक हॉटेल आणि टपरी, डीवायएसपी कार्यालया समोरील एक टपरी, बसस्थानक परिसरात असलेली टपरी इत्यादींचा समावेश आहे. त्यामुळे सदरील व्यावसायिकांवर संचारबंदी काळात जिल्हा कार्यकारी समितीने दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही म्हणून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या आदेशावरून तर पोलीस नाईक मंगेश मारुती भोले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि श्री.गुजर हे करत आहेत. दरम्यान शहरातील सर्वच व्यावसायिकांना वारंवार सूचना देऊनही कांही व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. मात्र सदरील गुन्हा दाखल झाल्याने अन्य व्यावसायिक धास्तावले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.