Home » माझा बीड जिल्हा » कुंबेफळ;अठरा वर्षीय युवकाचा मृत्यू

कुंबेफळ;अठरा वर्षीय युवकाचा मृत्यू

कुंबेफळ;अठरा वर्षीय युवकाचा मृत्यू

– केज / शरद गिराम

– केज तालुक्यातील कुंबेफळ येथे वीज पडून एका अठरा वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.

या बाबतची माहिती अशी की, दि.२९ जून सोमवार रोजी सायं ५:०० च्या दरम्यान श्रीनिवास सुरेश तपसे व त्यांची आई हे कुंबेफळ येथे त्यांच्या पाहुण्याला भेटून मोटार सायकलवरून चंदनसावरगाव येथे गावाकडे जात होते. त्यावेळी कुंबेफळ पासून एक कि.मी. अंतरावर सगजनी नावाने ओळखल्या जात असलेल्या शेताजवळ आले असता अचानक पाऊस सुरू झाला. त्यामुळे ते मोटार सायकल बाजूला थांबवून निवाऱ्यासाठी तेथे जवळच असलेल्या एका पत्र्याच्या शेडकडे जात असताना श्रीनिवास सुरेश तपसे वय १८ वर्ष यांच्या अंगावर वीज पडून जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी युसूफ वडगाव पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात येत असून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय केज येथे आणला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.