Home » महाराष्ट्र माझा » हिंगोलीत आठ जणांना कोरोनाची लागण.

हिंगोलीत आठ जणांना कोरोनाची लागण.

हिंगोलीत आठ जणांना कोरोनाची लागण.

– संतोष मानकर / हिंगोली

– एका माहिलेसह सात पुरुषाचा समावेश

हिंगोली – शुक्रवारी रात्री प्राप्त  अहवालानुसार औंढा तालुक्यातील भोसी येथील एका २२ वर्षीय गरोदर महिलेसह कळमनुरी तालुक्यातील सात व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला आहे. यात एसआरपीएफ जवान ,एक नोएडा तर तिसरा मुंबई वरून गावी परतला आहे इतर चार जनाना
कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व कोरोना बाधित संपर्कातील असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.
जिल्ह्यात कोरोनाचे एकूण २५९ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी २२९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आजघडीला एकूण ३० रुग्णावर उपचार सुरू आहेत.तसेच कळमनुरी येथे १६ रुग्णावर उपचार सुरू आहेत यात काजी मोहला सहा, टव्हा एक, कवडा सहा , गुंडलवाडी दोन, बाबळी एक यांचा समावेश आहे. तर कोविड सेंटर कळमनुरी येथे चार रुग्णावर उपचार सुरू आहेत यामध्ये एसआर पीएफचे तीन जवान आहेत. तर वसमत येथे दोन रुग्णावर उपचार सुरु आहेत यात बुधवार पेठ एक, चांद गव्हाण एक यांचा समावेश आहे.
याशिवाय लिंबाळा येथील केअर सेन्टर येथे पाच रुग्ण असून यात कनेरगाव नाका एक, संतुक पिंपरी एक, तालाब कट्टा एक, रिसाला दोन, यांचा समावेश आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात जवळा बाजार येथील एका रुग्णावर उपचार सुरु आहेत.तर सेनगाव येथे एका रुग्णावर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात एकूण क्वारंटाईन सेंटर व आयसोलेशन वॉर्ड मिळून ४४०२ रुग्णांना भरती केले आहे. त्यापैकी ३९१८ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.तर ३८०७ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला एकूण ५९४ रुग्ण भरती असून २८७ जणांचे अहवाल प्रलंबित असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.