Home » माझा बीड जिल्हा » खदानीत बुडून युवकाचा मृत्यू.

खदानीत बुडून युवकाचा मृत्यू.

खदानीत बुडून युवकाचा मृत्यू.

– केज प्रतिनिधी / शरद गिराम

केज – येथील बजरंग नगरच्या वडार वस्तीतीच्या पाठीमागील असलेल्या दगड खाणीच्या पाण्यात बुडून एक अठरा वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून त्याचे प्रेत सापडले आहे.
अंबाजोगाई येथील चंद्रकांत हनुमंत इटकर वय 18 वर्ष हा केज येथील त्याचे चुलते इटकर हे बीड रोड लगतच्या बजरंग नगर वडार वस्ती केज यांच्याकडे आला होता. तो दि. २७ जून रोजी वस्तीच्या मागे असलेल्या खदानीकडे गेला होता. त्यावेळी अनावधानाने तो खदाणीत पडला. ही घटना लहान मुलांनी पाहिली व वस्तीवर माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या आदेशा नुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महादेव गुजर व मंगेश भोले हे घटना स्थळी हजर झाले. खदानीत भरपूर पाणी असल्यामुळे जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करून पाणी काढून देण्याचाही प्रयत्न केला. परंतु पाणी भरपूर असल्यामुळे प्रेत सापडत नव्हते. म्हणून पोलिसांनी प्रेताचा शोध घेण्यासाठी स्थानिक पाणबुडे आणि अग्निशमन दल व नगर पंचायतीचे कर्मचारी यांच्या मदतीने मृतदेह शोध सुरू ठेवला. अखेर शेवटी १:३० वा. च्या दरम्यान मृतदेह हाती लागला. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद घेऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.