Home » ब्रेकिंग न्यूज » साहेब..आम्हाला वाचवा;न्याय द्या.- इंगोले

साहेब..आम्हाला वाचवा;न्याय द्या.- इंगोले

साहेब..आम्हाला वाचवा;न्याय द्या.- इंगोले

– संतोष मानकर / हिंगोली

पवित्रपोर्टल वरील प्रलंबित शिक्षकभरतीची पुढील निवड यादी तत्काळ जाहीर करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे रयत संकल्प डिएड बीएड संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष परमेश्वर इंगोले यांनी केली आहे.

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या शिक्षक भरतीस विशेष परवानगी देऊन आम्हा सर्व अभियोग्यता धारक बांधवांना न्याय द्यावा. कारण शासन पवित्र पोर्टल मार्फत 2017 पासुन शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवित असुन 3 वर्ष उलटून गेली तरी ही भरती पुर्णत्वास जाऊ शकलेली नाही. आम्ही आमची गुणवत्ता सिद्ध केली आहे आता आमची आपणांस कळकळीची विनंती आहे की पवित्रपोर्टल वरील प्रलंबित शिक्षकभरतीची पुढील निवडयादी तत्काळ जाहीर करावी कारण त्यासाठी नविन जाहिरात देण्याची पण गरज नाहीये.

सध्या कोरोनाने आमच्या घरची आर्थिक परिस्थिति खराब केली आहे त्यामुळे आता आमची आर्थिक, सामाजिक व मानसिक स्थिती पुर्णतः ढासळलेली आहे आणखी विषाची परीक्षा नको अन्यथा आम्ही आत्महत्येचे सत्र सुरू करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही.अगोदरच आई-वडिलांनी कर्ज काढून आमचे शिक्षण पूर्ण केले आहे.दु:खाचा डोंगर समोर उभा आहे.शिक्षक भरती पूर्ण नाही झाली तर बेरोजगारी आणि उपसमारीने ग्रासले जाऊ यातुन आम्हाला वाचवा व न्याय द्या.
मा. मंत्री महोदयांनी पवित्रपोर्टल वरील प्रलंबित शिक्षकभरतीची पुढील निवडयादी तत्काळ जाहीर करुन आम्हा सर्व अभियोग्यता धारकांना उपकृत करावे ही नम्र विनंती…. प्रतिलिपी :- मा.शालेय शिक्षणमंत्री-श्रीमती वर्षाताई गायकवाड
मा.ग्रामविकास मंत्री-श्री हसन मुश्रीफ साहेब
मा.अर्थ मंत्री-अजितदादा पवार
शालेय शिक्षण राज्यमंत्री:- बचुभाऊ कडू

Leave a Reply

Your email address will not be published.