संबळ वाद्य वाजून मुलाला इंजिनियर केलं..
– डोंगरचा राजा / आँनलाईन.
– दत्तात्रय धुमाळ यांच्या वीस वर्षापासूनचे परिश्रम कामी आले.
वडवणी – संबळ वाद्य वाजवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत मुलांचे शिक्षण जोपासणाऱ्या दत्तात्रय धुमाळ यांच्या वीस वर्षापासूनच्या परिश्रमाला यश मिळाले असून त्यांनी संबळ वाद्य वाजवून मुलाला इंजिनियर केलं असल्याने त्यांचं आता एक वेगळं नाव घेतलं जाऊ लागला आहे.
वडवणी शहरातील रहिवासी असलेल्या दत्तात्रय धुमाळ यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूकच आहे. बीड जिल्ह्यातील गावागावात प्रत्येकांच्या घरासमोर बसुन संबळ वाद्य वाजवत गवळण,अभंग या सह अनेकांच्या आवडी निवडी जोपासत हे अंभग, गवळण, लोकगीते गाऊन त्यातून मिळालेल्या काही रक्कमेतुन कुटुंबातील पती-पत्नी आणि दोन मुलं यांच्या पोटाची खळगी भरण्यासाठी चे प्रयत्न आणि दत्तात्रय धुमाळ यांचं सर्वात मोठं स्वप्न मुलाच्या करिअरसाठी आपण वाट्टेल ते करायला तयार आहोत अशी जिद्द करून मुलाला इंजिनिअर करायचं ठरवलं.मुलाने देखील आपल्या वडिलांच्या परिश्रमाची काळजी घेत आपणही आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करून दाखवु असे ठरवले होते.म्हणुन दत्तात्रय धुमाळ यांच्या वीस वर्षापासूनच्या संबळ वाद्य वाजवून मुलाला इंजिनिअर करायचं यासाठी घेतलेल्या परिश्रमचं चिज झालं आहे..
दुसरीकडे आजही धुमाळ कुटुंब उपासमारीचं जिवन जगत आहे.
धुमाळ कुटुंबाचे लोक डाऊन मध्ये मोठी तारांबळ उडाली.कोठेही जाता येईना.. वाद्य वाजवावं कोठे हा प्रश्न पडला.ऐकणार कोन.. देणगी देणार कोन.. अशा परिस्थितीमध्ये याच धुमाळ कुटुंबाला आधार देण्याची गरज आहे.