Home » महाराष्ट्र माझा » हिंगोलीत गोळी झाडून आत्महत्या..

हिंगोलीत गोळी झाडून आत्महत्या..

हिंगोलीत गोळी झाडून आत्महत्या..

– हिंगोली जिल्हा / संतोष मानकर

हिंगोली – हिंगोलीत पोलीस जमादाराची गोळी झाडून आत्महत्या ,पोलीस दलातील दुसरी घटना
पोलीस दलात एकच खळबळ, कारण स्पस्ट नाही
हिंगोली – येथील पोलीस मुख्या लयातील अरमोरर विभागात कार्यरत असलेले पोलीस जमादार यांनी स्वतःवर शनिवारी दुपारी कार्यालयातच स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. कारण मात्र अद्याप स्पस्ट झाले नाही. परंतु या आत्महतेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.पोलीस दलातील सहा वर्षनंतर ही दुसरी घटना आहे.
पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार येथील पोलीस मुख्यालयात( अरमोरर) शस्त्र दुरुस्ती विभागात कार्यरत असलेले पोलीस जमादार जितेंद्र साळी वय (४३) हे आपल्या विभागात शनिवारी कर्तव्य बजावत होते. त्यांचा स्वभाव ही प्रेमळ होता.अचानक स्वतःच्या छातीवर गोळी झाडल्याचा आवाज कार्यालयातील इतर विभागातील कर्मचाऱ्यांना आला असता,कर्मचाऱ्यांनी तातडीने अरमोरर विभागाकडे धाव घेतली असता पोलीस जमादार रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.या घटनेची माहिती  पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांना देण्यात आली.घटनस्थळी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, डीवायएसपी रामेश्वर वैन्जने आदींनी भेट दिली. त्यानंतर पंचनामा करण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले.त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावल्याने त्यांना पदोन्नती ही मिळाली होती. मात्र साळी यांनी एवढे टोकाचे पाऊल कसे घेतले असा प्रश्न पोलीस कर्मचाऱ्यांना पडला आहे. मात्र आत्महत्या का व कशासाठी केली हे काही कळायला मार्ग नाही. तपास झाल्यानंतरच नेमके कारण समोर येईल. यापूर्वी जिल्ह्यात मागील सहा वर्षांपूर्वी औंढा येथे कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षक पूनम महाजन यांनी देखील घरगुती वादातून गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर जिल्ह्यातील पोलीस दलातील आत्महत्या करण्याची ही दुसरी घटना असून साळी यांच्या घटनेने उजाळा मिळाला आहे. उशिरा पर्यन्त गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र या घटनेने जिल्ह्यातील पोलीस कर्मचाऱ्यात ताण तणाव आहे की अन्य काही यावर वरिष्ठ अधिकाऱ्याकडून संशोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.