Home » ब्रेकिंग न्यूज » या… शाळांतून विद्यार्थी काढा – अँड.अजित देशमुख.

या… शाळांतून विद्यार्थी काढा – अँड.अजित देशमुख.

या… शाळांतून विद्यार्थी काढा – अँड.अजित देशमुख.

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

– पाटोद्यात पाच शाळा भरतात एकाच परिसरात.

बीड – वेगवेगळ्या भागात मंजूर झालेल्या पाच शाळा पाटोद्यात एकाच शाळेच्या परिसरात भरविल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना जाण्या – येण्यासाठी विनाकारण दोन – दोन किलोमीटर जास्त अंतर चालावे लागते. मान्यतेच्या ठिकाणी या शाळा भरावा, अन्यथा या एकत्र करून एक शाळा ठेवा, अन्य शिक्षक बाहेर पाठवा, अशी मागणी जन आंदोलनाचे विश्वस्त अँड. अजित देशमुख यांनी केली आहे.

याकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करीत आहे. अनेक गोंधळ समोर आले. अनेक गैरव्यवहाराची प्रकरणे गाजली. पण आता याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. ही बाब योग्य नाही.

पाटोद्यात जिल्हा परिषद माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, भटगल्ली, जिल्हा परिषद शाळा, क्रांतीनगर, जिल्हा परिषद शाळा, गुलजापूर व केंद्रीय प्राथमिक शाळा, पाटोदा या पाच शाळा आहेत. या एकाच आवारात भरत आहेत.

शासन नियमाप्रमाणे एका शाळेपासून दुसऱ्या शाळेच्या अंतराचे निकष ठरले आहेत. या निकषाप्रमाणे शाळा वेगवेगळ्या पाच भागात मंजूर आहेत. प्रत्यक्षात एका शाळेच्या परिसरात अन्य शाळांची बांधकामे करता येत नाहीत, पण ती बेकायदा केली गेलेली आहेत. यामुळे विद्याथ्यांना दोन ते तीन कि.मी. अंतर चालून शाळे कडे जावे लागते. एकाच ठिकाणी पाच शाळा भरवायच्या असतील तर एकच शाळा चालवायला हवी. पाच शाळांची गरज नाही.

बांधकामास मान्यता देणारे, तेथील कर्मचाऱ्यांचा पगार काढणारे, आणि वेगवेगळ्या भागात मंजूर असताना एकाच परिसरात चालविण्यासाठी मान्यता देणाऱ्या सर्वच अधिकाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे. या साठी आता शाळांपुढे विध्यार्थी व पालकांनी आंदोलन करायला हवे.

दरम्यान, अँड. देशमुख यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्ह्या परिषद, बीड यांना निवेदन देऊन तात्काळ कार्यवाही करणे बाबत विनंती केली आहे. कोरोणा काळात विद्यार्थ्यांवर त्याचा कसलाही परिणाम होऊ नये, त्याचप्रमाणे जास्त शाळा चालवून शिक्षण खात्यावर पगाराचा पडणारा बोजा कमी करण्यासाठी एकच शाळा भरवून शिक्षकांना इतरत्र पाठवावे, अशी मागणीही जन आंदोलनाचे अँड. देशमुख यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.