Home » माझा बीड जिल्हा » खा.डाॅ.प्रितम मुंडेंनी दिल्या शुभेच्छा..

खा.डाॅ.प्रितम मुंडेंनी दिल्या शुभेच्छा..

खा.डाॅ.प्रितम मुंडेंनी दिल्या शुभेच्छा

– डोंगरचा राजा / आँनलाईन.

बीड – राज्य लोकसेवा आयोगाने गतवर्षी घेतलेल्या विविध पदांच्या परीक्षांचे निकाल शुक्रवारी जाहीर झाले.लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या निकालानुसार बीड जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी या परिक्षांमध्ये उत्तीर्ण झाले असून त्यांची प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड झाली आहे.बीड जिल्ह्याच्या भूमिपुत्रांनी अथक मेहनत,परिपूर्ण अभ्यास व जिद्दीच्या बळावर संपादित केलेल्या या यशामुळे जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.

सामाजिक,सांस्कृतिक व अध्यात्मिक क्षेत्राची गौरवशाली परंपरा लाभलेल्या आपल्या जिल्ह्याला या विद्यार्थ्यांमुळे नवी ओळख मिळाली असून त्यांच्या दैदिप्यमान यशामुळे जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्राला देखील झळाळी मिळाली आहे.प्रशासकीय अधिकारी म्हणून निवड झालेल्या या विद्यार्थ्यांचा आदर्श घेऊन जिल्ह्यातील विद्यार्थी यापुढे देखील ही परंपरा कायम ठेवतील हा विश्वास आहे.

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published.